अहमदनगर- शहरानजीक असलेल्या 'केके रेंज' या युद्ध सराव भूमीवर आज सोमवारी एसीसी अँड एस या लष्कराच्या यांत्रिकी पायदळाचा वार्षिक सराव अभ्यास पार पडला. आपल्या देशाचे आणि मित्रराष्ट्राचे वरिष्ठ लष्करी अधिकारी, प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत हा सराव पार पडला. यावेळी एसीसी अँड एसचे मेजर जनरल एस झा, एमआईआरसीचे ब्रिगेडियर विजय सिंह राणा उपस्थित होते.
युद्धाचा थरार...भारतीय यांत्रिकी पायदळाची थरारक प्रात्यक्षिके - Ahmadnagar latest news
यावेळी युद्ध सराव प्रात्यक्षिकामध्ये भारतीय लष्करी दलात असलेल्या रणगाड्यांनी आपल्या क्षमता, अचूकता, भेदकता, निडरता याचे प्रदर्शन करत दिलेल्या लक्षांवर अचूक मारा करत आपली युद्धसज्जता दाखवली.
भारतीय यांत्रिकी पायदळाची थरारक प्रात्यक्षिके
हेही वाचा - क्रिकेटचा देव 'साई'चरणी लीन; तब्बल 10 वर्षानंतर शिर्डीत
यावेळी युद्ध सराव प्रात्यक्षिकामध्ये भारतीय लष्करी दलात असलेल्या रणगाड्यांनी आपल्या क्षमता, अचूकता, भेदकता, निडरता याचे प्रदर्शन करत दिलेल्या लक्षांवर अचूक मारा करत आपली युद्धसज्जता दाखवली. आपल्या भारत देशाची ही यांत्रिकी पायदळाची ताकद प्रत्येक भारतीयांची अभिमानाने छाती फुगवणारी, आपल्या मित्रराष्ट्राला चकित करणारी आणि शत्रूराष्ट्राला धडकी भरवणारी अशीच आहे.