महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विशेष : गरिबांचे फ्रिज माठ; कोरोनानंतर यावर्षी माठांना चांगली मागणी - ahmednagar math demand news

माठ बनवण्यासाठी लागणाऱ्या मातीच्या दरामध्ये यंदाच्या वर्षी वाढ झाली आहे. तसेच भुशाच्या किमतीही वाढ झाली असल्याने यंदाचा वर्षी एका माठाचा किमतीमध्ये 20 ते 30 रुपयांनी वाढ करण्यात आली असल्याचे माठ व्यावसायिकांनी सांगितले.

demand to math in summer session in ahmednagar
माठांना यंदाच्या वर्षी चांगली मागणी

By

Published : Mar 10, 2021, 5:27 PM IST

Updated : Mar 10, 2021, 9:21 PM IST

अहमदनगर -यंदाही वर्षी उन्हाचा पारा मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच वर चढत आहे. यामुळे गरिबांचे फ्रिज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माठाची मागणी वाढली आहे. यामुळे माठ विक्री व्यावसायिकांना यंदाच्या वर्षी तरी काहीसा दिलासा मिळणार असल्याचे चित्र सध्या अहमदनगर जिल्ह्यातील आस्तगावमध्ये पाहायला मिळत आहे.

याबाबतच्या प्रतिक्रिया.

राहाता तालुक्यातील आस्तगाव येथील कुंभार व्यावसायिकांनी वर्षभर केलेल्या मेहनतीनंतर बनविण्यात आलेल्या माठांना उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर मागणी असते. मात्र, मागच्या वर्षी उन्हाळ्याचा सिजन सुरू होताच कोरोनामुळे लॉकडाऊन लागले आणि इतर व्यवसायांप्रमाणे हा व्यवसायही थांबला होता. यंदा पुन्हा आता उन्हाळ्याच्या सुरुवातीच्या एक महिने आधीपासूनच माठ विक्रीस सुरूवात झाली आहे. आता लोक फ्रिजचे पाणी पिण्याऐवजी माठातील पाण्याला अधिक पसंती देताना दिसुन येत आहे.

हेही वाचा -३६ वर्षांपूर्वी रवी शास्त्रींनी 'या' किताबासोबत जिंकली होती नवी कार!

माठ बनवण्यासाठी लागणाऱ्या मातीच्या दरामध्ये यंदाच्या वर्षी वाढ झाली आहे. तसेच भुशाच्या किमतीही वाढ झाली असल्याने यंदाचा वर्षी एका माठाचा किमतीमध्ये 20 ते 30 रुपयांनी वाढ करण्यात आली असल्याचे माठ व्यावसायिकांनी सांगितले. आता सध्या मोठ्या प्रमाणात नळ असलेल्या माठांना ग्राहक चांगली पसंती देत आहेत. आता पुन्हा कोरोनाने उन्हाळाच्या सिजनमध्ये डोकेवर काढत असल्याने जर पुन्हा लॉकडाऊन झाले तर व्यवसाय होईल की नाही? याची चिंता सतवत आहे.

व्यावसायिकांची अपेक्षा -

मागली वर्षीच्या उन्हाळ्यात माती आणि भुसा मोठ्या प्रमाणात खरेदी करून माठ बनावले होते. मात्र, अचानक कोरोनासारख्या महामारीमुळे लॉकडाऊन झाले. यामुळे सर्वच जण घरात बसुन असल्याने माठकडे पाठ फिरवली. याचाच फटका माठ व्यावसायिकांनाही बसला. बनवलेले माठ पडुन खराब झाले, अशी भावना माठ व्यावसायिकांनी ईटीव्ही भारतसोबत बोलताना व्यक्त केली. मात्र, यंदाच्या वर्षी तरी मागील वर्षी केलेला खर्च वाया गेलेला निघून येईल आणि दोन पैसे मिळतील, हीच अपेक्षा व्यावसायिक व्यक्त करत आहे.

हेही वाचा -केवळ सरकारी नोंदणीकृत डॉक्टरच 50 लाखांच्या पंतप्रधान विमा योजनेस पात्र, मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Last Updated : Mar 10, 2021, 9:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details