महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

एसटी महामंडळाचे सरकारमध्ये विलीनीकरण करण्याची मागणी, अन्यथा कर्मचारी संपाच्या पावित्र्यात

सरकारसोबत वाटाघाटी करूनही सरकार एसटी तोट्यात असल्याचे कारण देत महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वेतवाढ देत नाही. त्यामुळे आता एसटी महामंडळाचे राज्यशासनात विलीनीकरण करण्याशिवाय पर्याय नाही. येत्या 30 तारखेपर्यंत प्रलंबित मागण्या मान्य करून शासनात विलीनीकरण न झाल्यास राज्यातील सर्व एसटी कामगार संघटना ऐन दिवाळीच्या तोंडावर संपाच्या पावित्र्यात आहेत. एक नोव्हेंबर रोजी सदस्यांचे मतदान घेऊन याबाबत पुढील दिशा ठरवली जाणार असा इशारा महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचा विभागीय कामगार मेळावा
महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचा विभागीय कामगार मेळावा

By

Published : Oct 25, 2021, 7:45 AM IST

Updated : Oct 25, 2021, 8:49 AM IST

अहमदनगर -वेळोवेळी सरकारसोबत वाटाघाटी करूनही सरकार एसटी तोट्यात असल्याचे कारण देत महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वेतवाढ देत नाही. त्यामुळे आता एसटी महामंडळाचे राज्यशासनात विलीनीकरण करण्याशिवाय पर्याय नाही. येत्या 30 तारखेपर्यंत प्रलंबित मागण्या मान्य करून शासनात विलीनीकरण न झाल्यास राज्यातील सर्व एसटी कामगार संघटना ऐन दिवाळीच्या तोंडावर संपाच्या पावित्र्यात आहेत. एक नोव्हेंबर रोजी सदस्यांचे मतदान घेऊन याबाबत पुढील दिशा ठरवली जाणार असा इशारा महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचा विभागीय कामगार मेळाव्यानंतर बोलताना संघटनेचे पदाधिकारी

एक नोव्हेंबर पासून एसटीची चाके थांबणार

अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव इथे महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचा कामगार मेळावा झाला. त्यावेळी संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे, जनरल सेक्रेटरी हनुमंत ताठे, जिल्हा सरचिटणीस विजय लबडे या पदाधिकाऱ्यांनी हा इशारा दिला आहे. संपाबाबत शासकीय नियमांच्या अंमलबाजवणीसाठी लोणावळा इथे बैठक घेण्यात येऊन संपाबाबत मतदान घेण्यात येणार आहे. मात्र, आता शासनात विलीनीकरण आणि राज्य शासनाची मुद्रा मिळाल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही असा आक्रमक पवित्रा घेण्यात आला आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावत एसटी कामगार संपावर जाण्याच्या तयारीत असल्याने राज्य सरकारपुढे हे संकट असून यातून मार्ग काढण्यासाठी परिवहन मंत्री अनिल परब, मुख्यमंत्री ठाकरे यांच्या निर्णयाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोरोना काळात ३०६ मृत्यू, तर आर्थिक विवंचनेत २६ आत्महत्या

कोरोनाच्या संकट काळात दुसऱ्या जिल्ह्यात विशेषतः मुंबई-ठाण्यात सेवा बजावताना ३०६ एसटी कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच, आर्थिक विवंचनेतून २६ कर्मचाऱ्यांनी आता पर्यंत आत्महत्या केल्या आहेत. अशी बिकट परस्थिती असताना सरकार एसटी तोट्यात असल्याचे कारण देत मागण्या मान्य करून पूर्णत्वास नेत नाही. मात्र, एसटी तोट्यात असण्याला कर्मचारी नव्हे तर शासनाचे धोरण कारणीभूत आहे असे यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, या मेळाव्यास महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे, जनरल सेक्रेटरी हनुमंत ताठे, जिल्हा सरचिटणीस सुनील लबडे, शेवंगाव पंचायत समितीचे सभापती क्षितिज घुले यांच्यासह राज्य आणि जिल्ह्यातील संघटनेचे पदाधिकारी, संघटनेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा -ग्रंथसंग्रहालयाच्या अध्यक्षपदी पुन्हा शरद पवार

Last Updated : Oct 25, 2021, 8:49 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details