महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दिपाली सय्यदचे साकळाई योजनेसाठी शेकडो ग्रामस्थांसह आमरण उपोषण - युतीचे उमेदवार

नुकतंच झालेल्या लोकसभा निवडणुकीत वाळकी इथे आपल्या भाषणात खुद्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी या योजनेबाबत दीपाली सय्यद यांना आश्वासन देऊन विधानसभा निवडणुकी अगोदर या योजनेचे काम चालू होईल असे सांगितले होते.

दिपाली सय्यदचे साकळाई योजनेसाठी आमरण उपोषण

By

Published : Aug 9, 2019, 6:09 PM IST

अहमदनगर- चित्रपट अभिनेत्री दिपाली सय्यदनी शेकडो ग्रामस्थांसह जिल्हा परिषदेच्या आवारात उपोषण सुरू केले आहे. श्रीगोंदा-पारनेर-नगर अशा तीन तालुक्यातील 35 गावांना वरदान ठरणाऱ्या साकळाई उपसा सिंचन योजनेला मंजुरी मिळेपर्यंत आमरण उपोषणाचा इशारा दिपाली यांनी दिला आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून या तीन तालुक्यातील ३५ गावांना लाभदायक ठरणारी साकळाई उपसा सिंचन योजना फक्त निवडणुकीच्या प्रचारापुरतीच आहे. या योजनेवर राजकारण करून अनेकांनी निवडणुका लढवल्या आहेत. नुकत्याचं झालेल्या लोकसभा निवडणुकीत वाळकी इथे आपल्या भाषणात खुद्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी या योजनेबाबत दीपाली सय्यद यांना आश्वासन देऊन विधानसभा निवडणुकी अगोदर या योजनेचे काम चालू होईल, असे सांगितले होते.

दिपाली सय्यदचे साकळाई योजनेसाठी आमरण उपोषण

याच कारणामुळे सय्यद यांनी लोकसभा निवडणुकीत भाजप-सेना युतीचे उमेदवार सुजय विखे यांना पाठिंबा दिला होता. मात्र निवडणुका संपल्यानंतर मुख्यमंत्र्यांना आश्वासनाचा विसर पडला आहे. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी साकलाई योजनेस देण्यासाठी पाणी उपलब्ध नसल्याचे सांगितले. यासोबतच सरकारकडून या योजनेबाबत वेगवेगळी विधाने आल्यानंतर पुन्हा एकदा दीपाली सय्यद यांनी गेल्या दीड महिन्यापासून या योजने अंतर्गत येणाऱ्या ३५ गावांमध्ये जाऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. आजपासून त्यांनी साकळाई उपसा सिंचन योजनेला मंजुरी मिळेपर्यंत उपोषण सुरु केले आहे. त्यांच्याबरोबर ३५ गावातील शेकडो ग्रामस्थ सहभागी झाले आहेत. ठोस उपाययोजना होणार नाही, तोपर्यंत हे उपोषण सोडणार नसल्याचे दीपाली सय्यद यांनी स्पष्ट केलं आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details