अहमदनगर -सहा दिवसांपूर्वी अपहरण झालेले श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील व्यापारी गौतम हिरण (वय 49 ) यांचा मृतदेह राहाता तालुक्यातील वाकडी शिवारातील एमआयडीसीच्या पुढे तीन किलोमीटर अंतरावर आज सकाळी कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई, भाऊ, चुलते असा मोठा परिवार आहे.
अपहरण आणि हत्येबाबत तर्क-वितर्क
या दुर्दैवी घटनेमुळे जिल्हात एकच खळबळ उडाली असून त्यांची हत्या तीन-चार दिवसांपूर्वीच झाली असावी, अशी शक्यता दिसत आहे. या प्रकरणाचा घटनाक्रम पाहता गुन्हेगार स्थानिक असावेत, अशीही चर्चा आहे. तसेच, त्यांचे सिनेस्टाईलने अपहरण आणि हत्या करण्यामागे नेमके काय कारण असावे, याबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. त्यामुळे घटनेच्या मुळापर्यंत जाऊन गुन्हेगार शोधून काढणे हे पोलिसांपुढे मोठे आव्हान आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच बेलापूरचे ग्रामस्थ, तालुक्यासह जिल्ह्यातील व्यापारी यांनी तीव्र संताप व्यक्त करून गुन्हेगारांचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
हेही वाचा -शिर्डीच्या स्वच्छतेसाठी भाविकांकडून कर वसुलीचा ठराव; शिवसेना-राष्ट्रवादीचा विरोध
गौतम हिरण गेल्या सोमवारपासून बेपत्ता