अहमदनगर - पारनेर तालुक्यातील निघोज येथे कुंडावर एका महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. घटनास्थळी जाऊन पारनेर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी पाहणी केली. या तपासणीवरून महिला ही 30 ते 35 वयाची असून गेले 4 महिन्यापूर्वी तिचा मृत्यू झाल्याचा वैद्यकीय अधिकाऱ्यांचा अंदाज आहे.
अहमदनगर : निघोज कुंडावर आढळला महिलेचा कुजलेला अवस्थेतील मृतदेह - Ahmednagar Crime News
अहमदनगर जिल्ह्यातील निघोज येथे कुंडावर एका महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला. या प्रकरणी पारनेर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
निघोज कुंडावर आढळला महिलेचा कुजलेला मृतदेह
महिलेच्या अंगावरील कपड्यावरून ओळख पटवण्याचा प्रयत्न केला. मात्र,, सदर महिला ओळखीची नसल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृतदेह कुजलेला असल्याने ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरांनी मृतदेहाचे जागेवरच शवविच्छेदन केले. या प्रकरणातील महत्वाचे घटक तपासणी साठी ठेवले आहेत. पारनेर पोलिसांनी तहसीलदार देवरे यांच्या समक्ष पंचनामा केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेश गवळी करत आहेत.