महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अहमदनगरमध्ये स्वाईन फ्लूने गर्भवतीचा मृत्यू

अहमदनगरमधील राहाता तालुक्यातील खंडोबाची वाकडी या गावात एका ७ महिन्याच्या गर्भवती महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला आहे. सीमा अमोल आहेर (वय २५), असे मृत झालेल्या महिलेचे नाव आहे.

सीमा आहेर

By

Published : Mar 15, 2019, 2:43 PM IST

अहमदनगर - राहाता तालुक्यातील खंडोबाची वाकडी येथील एका ७ महिन्याच्या गर्भवती महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला आहे. सीमा अमोल आहेर (वय २५), असे मृत झालेल्या महिलेचे नाव आहे. या घटनेने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे.

सीमाच्या काही दिवसापूर्वी अचानक पोटात दुखू लागले. त्यामुळे तिला राहाता येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यावेळी तिला गोचिड ताप आणि शरीरातील पांढऱ्या पेशी कमी झाल्याचे निष्पन्न झाले. तिच्यावर उपचार झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. मात्र, ती आपल्या माहेरी आहेर चितळी या गावी गेली असता तिला अचानक खोकला सुरू झाला. यानंतर नातेवाईकांनी तिला लोणी येथील प्रवरा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान सीमाचा मृत्यू झाला.

वैद्यकीय अहवालात सीमाला स्वाईन फ्लू झाल्याचे निष्पन्न झाले. सीमाला ५ वर्षाची आराध्या नावाची मुलगी असून त्या सध्या ७ महिन्याच्या गर्भवती होत्या. या आजाराने त्यांच्या बरोबर ७ महिन्याच्या गर्भात असलेल्या बालकालाही जीव गमवावा लागला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details