महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'पात्रतेपेक्षा जास्त मिळालेल्या पडळकरांचे संस्कार त्यांच्या भाषेवरून स्पष्ट होतात' - महसूलमंत्री थोरात यांची कन्या

थोरांत यांच्या या टीकेवर आमदार पडळकर यांनी थोरातांना लक्ष्य केले होते. महसूल मंत्री पदाच्या रस्सीखेचामुळे काही लोक भ्रमिष्टाप्रमाणे गांजा पिल्यासारखे बरळू लागले आहेत. मुळात देवेंद्र फडणवीसांचे लग्न विदर्भयात्रेच्या पाच वर्षा अगोदरच झाले आहे. याचेही भान यांना राहिले नाही, असे ट्विट करत पडळकरांनी थोरातांना निशाण्यावर घेतले होते.

पडळकरांचे संस्कार त्यांच्या भाषेवरून स्पष्ट होतात'
पडळकरांचे संस्कार त्यांच्या भाषेवरून स्पष्ट होतात'

By

Published : Jun 30, 2021, 10:54 AM IST

शिर्डी (अहमदनगर)- राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून पेटलेल्या राजकारणात भाजपाचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका केली. थोरात यांनी पडळकरांना काही उत्तर देण्यापूर्वीच त्यांची कन्या शरयू देशमुख यांनी पडळकरांना प्रत्युत्तर दिले आहे. 'पात्रतेपेक्षा जास्त मिळाले की असे होते', अशा शब्दांत शरयू देशमुख यांनी पडळकरांना टोला लगावला आहे.

राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे. त्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘माझ्या हाती सत्ता द्या, ओबीसींना चार महिन्यांत पुन्हा आरक्षण मिळवून देईन, अन्यथा राजकारणातून संन्यास घेईन, असे वक्तव्य केले होते. त्यावर टीका करताना महसूलमंत्री थोरात यांनी फडणवीसांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही. विदर्भ राज्याच्या मागणीसाठीही त्यांनी पूर्वी लग्न न करण्याची प्रतिज्ञा केली होती, अशी टीका केली होती.

पडळकरांचे संस्कार त्यांच्या भाषेवरून स्पष्ट होतात
थोरांत यांच्या या टीकेवर आमदार पडळकर यांनी थोरातांना लक्ष्य केले होते. महसूल मंत्री पदाच्या रस्सीखेचामुळे काही लोक भ्रमिष्टाप्रमाणे गांजा पिल्यासारखे बरळू लागले आहेत. मुळात देवेंद्र फडणवीसांचे लग्न विदर्भयात्रेच्या पाच वर्षा अगोदरच झाले आहे. याचेही भान यांना राहिले नाही, असे ट्विट करत पडळकरांनी थोरातांना निशाण्यावर घेतले होते.

पडळकर यांच्या या ट्विटला थोरातांच्या कन्या आणि अमृतवाहिनी कृषी व शैक्षणिक संस्थेच्या संचालिका शरयू देशमुख यांनी ट्वीटद्वारेच उत्तर दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की. 'पात्रतेपेक्षा जास्त मिळाले की असं होते. आपल्या भाषेवरून आपल्या संस्कारांची ओळख होते, असो ज्याचे त्याचे संस्कार'. अशा भाषेत त्यांनी पडळकर यांच्यावर टीका करून त्यांना भाषा आणि संस्काराची आठवण करून दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details