अहमदनगर -येथील मुळा-भंडारदरा धरणात पाण्याची आवक सुरु असल्याने भंडारदरा येत्या चार दिवसात भरणार असल्याचे चित्र आहे.
अहमदनगर जिल्ह्याला वरदान ठरणाऱ्या मुळा,भंडारदरा आणि निळवंडे या तीनही प्रमुख धरणातील पाणीसाठा वाढताना दिसत आहे. जिल्ह्यात क्षमतेने सर्वात मोठे असलेल्या (२६ हजार टीएमसी) मुळा धरणात १५,०९० दलघफू (४५%) पाणी साठा आहे. भंडारदरा धरणात ९,१६५ दलघफु (83.02%) तर, निळवंडे धरणात ४,०५० दलघफु (४८.६१%) इतका पाणी साठा जमा झाला आहे.
धरणातील पाण्याची दलघफू/टीएमसी/टक्केवारी