महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पाथर्डी तालुक्यातील वृक्षतोडीने निसर्गाची हानी - पाथर्डी तालुक्यात वृक्षतोड

पाथर्डी तालुक्यात निसर्ग संवर्धनासाठी सामाजिक क्षेत्रातून वृक्ष लागवड व संवर्धन केले जात आहे. परंतु तालुक्यातील प्रामुख्याने ग्रामीण भागात वनविभागाच्या दुर्लक्षामुळे जळावू लाकडासाठी हजारो वृक्षांची कत्तल होत आहे.

पाथर्डी तालुक्यातील वृक्षतोडीने निसर्गाची हानी
पाथर्डी तालुक्यातील वृक्षतोडीने निसर्गाची हानी

By

Published : Jun 15, 2021, 10:40 AM IST

पाथर्डी- अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील गर्भगिरीच्या डोंगर रांगेत वनविभागाच्या दुर्लक्षामुळे दैनंदिन जळावू लाकूडफाट्यासाठी हजारो वृक्षांची कत्तल होत आहे. त्यामुळे निसर्गाची अपरिमित हानी होत आहे. वनविभाग वृक्षतोडीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे निसर्गप्रेमींचे म्हणने आहे. यामुळे निसर्गप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, दोषीवर कारवाई व्हावी अशी मागणी केली जात आहे.

पाथर्डी तालुक्यातील वृक्षतोडीने निसर्गाची हानी

वनविभागाचे वृक्षतोडीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष

तालुक्यातील निसर्ग संवर्धनासाठी सामाजिक क्षेत्रातून वृक्ष लागवड व संवर्धन केले जात आहे. परंतु तालुक्यातील प्रामुख्याने ग्रामीण भागात वनविभागाच्या दुर्लक्षामुळे जळावू लाकडासाठी हजारो वृक्षांची कत्तल होत आहे. तालुक्याचा दक्षिण भाग असलेली गाव केळवंडी, चेकेवाडी या परिसरातील डोंगर पायथ्याला लिंब, बाभूळ, जांभूळ, दाबुर्डा, हेकळ, सिताफळ, खैर, भोकर, करवंद यासह विविध वनौषधींच्या वृक्षांची मोठ्या प्रमाणात तोड केली आहे व मोठमोठ्या सरपणाचे ढीग रचले आहेत. विविध वनौषधींमुळे सोन्याचा डोंगर म्हणूण ओळख असलेला परिसर अमाप वृक्षतोडीमुळे बोडखा झाला आहे. वनविभाग वृक्षतोडीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे निसर्गप्रेमींचे म्हणने आहे. यामुळे निसर्गप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, दोषीवर कारवाई व्हावी अशी मागणी केली जात आहे.

हेही वाचा -हेल्थकार्ड सिस्टीम ही नव्या आरोग्य व्यवस्थेची सुरवात ठरेल - डॉ. राजेंद्र विखे पाटील

ABOUT THE AUTHOR

...view details