अहमदनगर - देशातील दुसऱ्या क्रमांकाचे देवस्थान असलेल्या शिर्डीत दररोज पन्नास कोटींच्या वर आर्थिक उलाढाल होते. मात्र, लॉकडाऊनमुळे मंदिर बंद झाल्याने दोन महिन्यात शिर्डीतील अब्जावधींची उलाढाल थांबली आहे. देशात लॉकडाऊन सुरू होण्याअगोदरच साई मंदिर बंद करण्यात आले होते.
कोरोना इफेक्ट: शिर्डीत दररोज होणारी 50 कोटींची उलाढाल लॉकडाऊनमुळे ठप्प - हॉटेल व्यावसायिक
शिर्डीत साईबाबा समाधीच्या दर्शनासाठी दररोज देश-विदेशातून येणाऱ्या लाखो भाविकांमुळे शिर्डीत कोट्यवधींची उलाढाल होते. मात्र, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी साईमंदीर गेल्या 17 मार्चपासूनच बंद करण्यात आले आहे. मंदिर बंद झाल्याने दोन महिन्यात शिर्डीतील अब्जावधींची उलाढाल थांबली आहे.
शिर्डीत साईबाबा समाधीच्या दर्शनासाठी दररोज देश-विदेशातून येणाऱ्या लाखो भाविकांमुळे शिर्डीत कोट्यवधींची उलाढाल होते. मात्र, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले. साईमंदीरही गेल्या 17 मार्चपासूनच बंद करण्यात आले आहे. भाविकांमुळे शिर्डीत चालणारे छोटे मोठे व्यवसाय तसेच लॉजिंग, हॉटेल, रेस्टॉरंट बंद आहेत. शिर्डीत सातशे ते आठशे हॉटेल आहेत तर पन्नासपेक्षा जास्त तारांकित हॉटेल आहेत. प्रवासी वाहतूक करणाऱया शेकडो गाड्या, फुल विक्री व्यवसाय आणि हातावर छोटे मोठे व्यवसाय असे अनेक व्यवसायही बंद होवून पन्नास दिवसांचा कालावधी उलटला आहे. या दरम्यान अब्जावधी रुपयांचा व्यवहार ठप्प झाला.
शिर्डीतील अनेक हॉटेल कामगार बेरोजगार झाले आहेत. काही हॉटेल व्यावसायिकांकडे पैसे नसल्याने कर्मचाऱ्यांचे पगार देऊ शकले नाहीत. त्यामुळे काही व्यावसायिकांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरातील किराणा सामान भरून देण्याचा प्रयत्न केला. गर्दीचे ठिकाण असलेले शिर्डी शहर पुर्ववत होण्यास दिवाळीपर्यंत वेळ लागेल असे व्यावसायिकांचे म्हणने आहे.