अहमदनगर - राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या प्रेरणा प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या दहीहंडीमध्ये मुंबईच्या भगवान बाबा गोविंदा पथकाने मान पटकवला आहे. यंदा उत्सवाला प्रसिद्ध हिंदी अभिनेत्री डेझी शाह उपस्थित होती. त्यामुळे दहीहंडीचा थरार अनुभवण्याबरोबरच डेझी शाहला पाहण्यासाठी नागरिकरांनी तुफान गर्दी केली होती.
अहमदनगरमधील दहीहंडीत अभिनेत्री डेझी शाहला पाहायला तुफान गर्दी - राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप
राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या प्रेरणा प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या दहीहंडीमध्ये मुंबई येथील भगवान बाबा गोविंदा पथकाने सात थर लावत दहीहंडी फोडली आणि 1 लाख 11 हजार 111 रुपयांचे पहिले बक्षीस पटकावले.
प्रेरणा प्रतिष्ठानच्यावतीने दरवर्षी दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात येते. या दहीहंडी उत्सवासाठी मुंबई, ठाणे यासह नगर शहरातील अनेक गोविंदा पथकांनी सहभाग घेतला. यात मुंबई येथील भगवान बाबा गोविंदा पथकाने सात थर लावत दहीहंडी फोडली आणि 1 लाख 11 हजार 111 रुपयांचे पहिले बक्षीस पटकावले. दहीहंडी उत्सवाचे आकर्षण असलेल्या प्रसिद्ध हिंदी अभिनेत्री डेझी शाह यावेळी उपस्थित होती. तिला पाहण्यासाठी तरुण-तरुणींनी एकच गर्दी केली होती. आमदार संग्राम जगताप यांचे वडील आमदार अरुण जगताप आणि सासरे आणि भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यावेळी उपस्थित होते.