अहमदनगर - पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यानंतर सर्व देश शोकाकुल झाला. यानंतर दहशतवादाचा खात्मा व्हावा, अशी सर्व देशवासियांची प्रतिक्रिया होती. त्यातीलच एक नागरिक दहशतवाद मुक्त भारतासाठी साई बाबांच्या दरबारी दाखल झाला आहे. पश्चिम बंगालमधील दुर्गापूर येथून सायकल चालवत तो शिर्डीत दाखल झाला आहे.
नवी कोरी सायकल, डोक्यावर हेल्मेट, सायकलवर तिरंगा आणि समोर शामापौदी शर्मा असे नाव लिहिलेला फलक. ४९ वर्षीय शामापौदी या अवतारात आपले लक्ष वेधून घेतात. फलकावरील 'जय हिंद' हा शब्द त्यांच्या या प्रवासाच्या हेतूची किंचित कल्पना देतो. त्यांच्याशी बोलल्यानंतर ते २ हजार ५०० किमीचा प्रवास करून आले आहेत यावर विश्वास बसत नाही.