महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

साईनगरीत भक्तांची रेलचेल; दर्शनासाठी भाविकांची रिघ

साई समाधीच्या दर्शनासाठी किमान दोन ते तीन तास लागत आहेत. त्यामुळे भाविकांना लवकरात लवकर साई समाधीचे दर्शन मिळावे यासाठी साई संस्थानकडून प्रयत्न केले जात असल्याची माहिती साई संस्थानचे कार्यकारी अधिकारी दिपक मुंगळीकर यांनी दिली आहे.

By

Published : Oct 30, 2019, 1:26 PM IST

शिर्डी- दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे साईबाबांच्या शिर्डीत भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. आज (बुधवार) दोन लाखांहून अधिक भाविक साई नगरीत दाखल झाले आहेत. भक्तांच्या गर्दीने साईमंदिराकडे जाणारे सर्व रस्ते फुलून गेले आहेत. साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या असून दर्शनासाठी किमान दोन ते तीन तास रांगेत उभे रहावे लागत आहे.

शिर्डीत भाविकांची गर्दी

हेही वाचा -कर्करोगाशी लढा देणारी रम्या एक दिवसासाठी बनली रचाकोंडाची 'पोलीस आयुक्त'

मागील शुक्रवारपासून दिवाळीच्या सुट्ट्या लागल्याने देशभरातून लाखो भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीमध्ये दाखल झाले आहेत. या सुट्ट्यांमध्ये शिर्डीला येणाऱ्या भक्तांचा ओघ लक्षात घेता साईबाबा संस्थानच्यावतीने दर्शनाची तसेच निवासाची चोख व्यवस्था केली आहे. तसेच भक्तांच्या सुरक्षेचीही काळजी घेतली जात आहे. तसेच संस्थानच्यावतीने ठिकाठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच प्रसादलयात भोजन व्यवस्था करण्यात आली आहे.

हेही वाचा -मुंबईत भाजप विधिमंडळ नेता निवड बैठक; काय असणार उद्धव ठाकरेंची भूमिका?

साई समाधीच्या दर्शनासाठी किमान दोन ते तीन तास लागत आहेत. त्यामुळे भाविकांना लवकरात लवकर साई समाधीचे दर्शन मिळावे यासाठी साई संस्थानकडून प्रयत्न केले जात असल्याची माहिती साई संस्थानचे कार्यकारी अधिकारी दिपक मुंगळीकर यांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details