अहमदनगर- आजपासून सुरु झालेल्या नाताळच्या सुट्यांमुळे शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी भाविकांनी चांगलीच गर्दी केली असून आज लाखांहून आधिक भाविक शिर्डीत दाखल झाले आहेत. मोठ्या प्रमाणात वाढलेल्या भक्तांच्या गर्दीने साईमंदिराकडे जाणारे सर्व रस्ते फुलून गेले आहेत. साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या असून भक्तांना साई दर्शनासाठी किमान चार तास रांगेत उभे राहवा लागत आहेत.
नाताळ, नवीन वर्षाच्या स्वागतासाठी साई भक्तांची शिर्डीत गर्दी - साई
आजपासून सुरु झालेल्या नाताळच्या सुट्टयांमुळे शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी भाविकांनी चांगलीच गर्दी केली असून आज लाखांहून आधिक भाविक शिर्डीत दाखल झाले आहेत.
आजपासून नाताळच्या सुट्या लागल्याने आज देश भारातून लाखो भाविक साईबाबांचा दर्शनासाठी शिर्डीमध्ये दाखल झाले आहे. या सुट्यामध्ये शिर्डीला येणाऱ्या भक्तांचा ओघ लक्षात घेता साईबाबा संस्थानच्या वतीने दर्शनाची तसेच निवासाची चोख व्यवस्था केली असून भक्तांच्या सुरक्षाचीही काळजी घेतली जात आहे. नाताळ आणि नववर्षाची संभाव्य गर्दी लक्षात घेवून पोलीस प्रशासन तसेच साई मंदिर प्रशासनाकडून योग्य ती व्यवस्था करण्यात आली आहे. तर ही गर्दी अशीच दहा दिवस राहण्याचे चित्र आहे.
हेही वाचा - शिर्डी महोत्सव : दर्शनासाठी 31 डिसेंबरला साई मंदिर रात्रभर राहणार खुले