महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिर्डीच्या साई मंदिरात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा; उपाययोजना फेल - शिर्डी साई मंदिर बातमी

शिर्डी साई मंदिरात आणि परिसरात सोशल ़डिस्टन्सिंगचा दुसऱयाच‌ दिवशी फज्जा उडाला आहे.

sai temple
साई मंदिरात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

By

Published : Nov 17, 2020, 4:55 PM IST

शिर्डी(अहमदनगर) - धार्मिकस्थळे सुरू करताना नियमांचे पालन काटेकोरपणे करण्याच्या सूचना व्यवस्थापन मंडळांना राज्य सरकारने दिल्या आहेत. अशात शिर्डी साई मंदिरात आणि परिसरात सोशल ़डिस्टन्सिंगचा दुसऱयाच‌ दिवशी फज्जा उडाला आहे. वयोवृद्ध नागरिकांसह लहान मुलांनादेखील दर्शनासाठी मंदिरात प्रवेश दिला जात असल्याचे समोर आले आहे.

प्रतिनिधी रविंद्र महाले यांनी घेतलेला आढावा...

राज्य सरकारने मंदिरं खुली करताना कोविडचा संस‌र्ग होऊ नये यासाठी नियमावली आखून दिली आहे. परंतु, त्या नियमांचे पालन होताना दिसत नाही. साईबाबा संस्थानने केलेल्या‌ उपाययोजना फोल ठरल्याचे दिसत आहे. ऑनलाइन दर्शनात वेळोवेळी तांत्रिक बिघाड येत असल्याने ऑफलाइन दर्शनासाठी मोठी गर्दी होत आहे. दर्शन रांगेत सामाजिक अंतर ठेवण्यासाठी प्रयत्न होत आहेत. मात्र, ऑफलाइन काउंटर समोर फज्जा उडत आहे.

उपाययोजनांचा फज्जा -

भाविकांची गर्दी कमी करण्यासाठी किंवा सुचना देण्यासाठी कोणतेही कर्मचारी दिसत नाहीत. ज्यावेळी प्रसारमाध्यमांचे प्रतिनीधी तेथे पोहोचले त्यानंतर सुरक्षा कर्मचाऱयांना तेथे पाठवण्यात आले. भक्तांसाठी सावलीची व्यवस्था नसल्याने कडक उन्हात त्यांना ताटकळत उभे राहावे लागत आहे. जी परिस्थिती ऑफलाइन दर्शन काउंटर समोर तिच परिस्थिती संस्थानच्या मोबाइल आणि चप्पल स्टँडसमोर दिसून येत आहे. भाविक दर्शन करून बाहेर पडल्यानंतर मोबाइल काउंटरला गर्दी करत असल्याच‌े दिसून येत आहे. संस्थानची ही व्यवस्था देखील कोलमडली आहे.

हेही वाचा -बाळासाहेबांचा स्मृतिदिन : असाल तेथून अभिवादन करा, मुख्यमंत्री ठाकरे यांचे आवाहन

हेही वाचा -पोटापाण्यासाठी दारू विकली तर काय झालं? शिवेसेना आमदाराची जीभ घसरली

ABOUT THE AUTHOR

...view details