अहमदनगर - परतीच्या पावसाने काढणीला आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्याच्या संकटात आणखी वाढ झालीय. पिकांचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करत आहेत.
बोधेगावसह शेवगाव तालुक्यात जोरदार पाऊस; शेती पाण्याखाली - ahmednagar agriculture
बोधेगावसह सभोवतालच्या परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने पाताळ गंगेला मोठा पूर आला. त्यामुळे शेवगांव - गेवराई हा राज्य महामार्ग तब्बल पाच तास बंद होता. यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
![बोधेगावसह शेवगाव तालुक्यात जोरदार पाऊस; शेती पाण्याखाली rain in ahmednagar](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-9141610-797-9141610-1602467810649.jpg)
बोधेगावसह सभोवतालच्या परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने पाताळ गंगेला मोठा पूर आला. त्यामुळे शेवगांव - गेवराई हा राज्य महामार्ग तब्बल पाच तास बंद होता. यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
दरम्यान मागील वर्षी वातावरणातील बदलामुळे कापसावर बोंड आळी तर दिवाळी दरम्यान महिनाभर पडत आसलेल्या पावसाने बाजरीसह अन्य धानाला मोड आले होते. तर यंदा पावसामुळे नुकसान झाले आहे. सोयाबीन, तूर, कांदे आणि कापसाच्या शेतांमध्ये पाणी साचल्याने कमी उत्पन्न निघण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने सरसकट पंचनामे करून तात्काळ मदतीची रक्कम खात्यावर वर्ग करण्याची मागणी बोधेगाव सह कांबी, हातगाव, मुंगी, बालमटाकळी, लाडजळगाव, आधोडी, दिवटे, शोभानगर, चेडेचांदगाव भागातील शेतकरी करत आहेत.