पाथर्डी(अहमदनगर)- तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नदीनाले तुडुंब भरले आहेत. मात्र, सततच्या या पावसामुळे खरीप हंगामातील पिके पाण्याखाली गेली आहेत. काही ठिकाणी पिकाची कापणी झाली नाही, तर काही ठिकाणी कापणी करून पडलेल्या पिकाला आता मोड येऊ लागले आहेत. परिणामी हाताशी आलेले पीक यंदा वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त करण्यात येत आहे. त्यातच खरीप पिके काढून रब्बीसाठी जमिनीला वापसा येणार नसल्याने शेततरी दुहेरी संकटात सापडला आहे.
पाथर्डी तालुक्यातील संततधार पावसाने पिके पाण्यात; शेतकरी दुहेरी संकटात - पाथर्डीत खरीपाची पिके पाण्यात
गेल्या आठवड्यात सुरू झालेल्या पावसामुळे सर्व पिके पाण्याखाली गेली आहेत. शेतकऱ्यांची अनेक कामे खोळंबली असून पाण्यातील पीक काढता येत नसल्याने उडीद, मुग हावरी या पिकाला बुरशी लागली. कांदा पिकात पाणी साठल्याने तो जमिनीतच सडून गेला आहे. डाळिंब, संत्री, मोसंबी असे फळबागा मध्ये फळांचा जमिनीवर सडा पडला आहे.
गेल्या २ दिवसात तालुक्यातील महसुली मंडळ पाथर्डी-४५ मिमी, माणिकदौंडी २०- मिमी, मिरी ३३- मिमी, करंजी १७ -मिमी, कोरडगाव ६५ -मिमी, टाकळीमानूर ६०- मिमी याप्रमाणे एकूण २२६ मिली मीटर पाऊसाची नोंद झाली आहे. या पावसानंतर तालुक्यातील मोहरी, शिरसाटवाडी, घाटशीळपारगाव, कुतरवाडी, येळी, जांभळी, पिंपळगावटप्पा, मिडसांगवी, करोडी, कोकीपीर तांडा या ठिकाणचे तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहेत. मात्र, गेला आठवडाभर सुरू असलेल्या पावसामुळे करंजी, घाटशिरस या पट्ट्यातील पश्चिम भाग वगळता तालुक्यात शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
अनेक ठिकाणी पिकांची कापणी होऊन पीक शेतातच मळणीसाठी पडून होते. मात्र, गेल्या आठवड्यात सुरू झालेल्या पावसामुळे सर्व पिके पाण्याखाली गेली आहेत. शेतकऱ्यांची अनेक कामे खोळंबली असून पाण्यातील पीक काढता येत नसल्याने उडीद, मुग हावरी या पिकाला बुरशी लागली. कांदा पिकात पाणी साठल्याने तो जमिनीतच सडून गेला आहे. डाळिंब, संत्री, मोसंबी असे फळबागा मध्ये फळांचा जमिनीवर सडा पडला आहे.