अहमदनगर - देशात क्रिकेटचा देव म्हणून ओळख असलेला दिग्गज क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडुलकरने आज (सोमवारी) सहपरिवार शिर्डीत साईदरबारी हजेरी लावली. यावेळी त्याने साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दुपारच्या सुमारास सचिन साई दरबारी येणार असल्याची चर्चा शिर्डीत परसली होती. यानंतर सचिनला पाहण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी मंदिर परिसरात मोठी गर्दी केली होती. सचिन साईमंदिरात जाताना आणि बाहेर आल्यानंतर चाहत्यांनी 'सचिन, सचिन' अशा जोरदार घोषणा दिल्या.
सचिन आज पत्नी अंजली, मुलगा अर्जुन आणि आपल्या काही मित्र परिवारासोबत दुपारी खाजगी विमानाने शिर्डीला आले होते. यानंतर त्यांनी साईमंदिरात जाऊन साई समाधीचे दर्शन घेतले. तसेच साईंची पाद्य पुजाही केली. साईबाबा संस्थानच्या वतीने कार्यकारी अधिकारी दिपक मुगळीकर यांनी सचिनचा साईंची शॉल आणि मूर्ती देऊन सत्कार केला. तर शिर्डीकरांच्या वतीने नगराध्यक्षा अर्चना कोते यांनी साईबाबांची प्रतिमा देऊन सचिनचा सत्कार केला.