महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोना टेस्ट लॅबची क्षमता आता प्रतिदिन १ हजार चाचण्यांची , जिल्हाधिकाऱ्यांची माहिती - Ahmednagar total corona positive case

सध्या जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेने 'चेस द व्हायरस' हे लक्ष्य ठेऊन रुग्णांपर्यंत पोहोचण्याची मोहीम आखली आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी यासंदर्भात आरोग्य यंत्रणा आणि सर्व तालुकास्तरीय यंत्रणांना निर्देश दिले आहेत. रॅपिड अँटीजेन चाचण्यांच्या माध्यमातून ही मोहीम गतिमान झाली आहे. आता जिल्हा रुग्णालयातील लॅबची क्षमता वाढल्याने प्रादुर्भाव रोखण्याच्या प्रशासनाच्या प्रयत्नांना अधिक गती मिळणार आहे.

Ahmednagar corona testing lab
Ahmednagar corona testing lab

By

Published : Aug 3, 2020, 11:38 AM IST

अहमदनगर- जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. या विषाणूच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठीचे प्रयत्न जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेकडून अधिक गतिमान करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली आहे. अधिकाधिक चाचण्या करून बाधितांना लवकर शोधण्यासाठी प्रयत्न होत असून त्याचाच भाग म्हणून जिल्हा रुग्णालयातील कोरोना टेस्ट लॅबची क्षमता आता प्रतिदिन एक हजार चाचण्या एवढी करण्यात आली असल्याचे द्विवेदी यांनी दिली.

कोरोना चाचणी संख्या वाढविण्यात आल्याने आता ज्यांना कोरोनाच लक्षणे असतील, तसेच बाधित रुग्णाच्या निकट संपर्कातील असतील अथवा इतर गंभीर आजारांनी त्रस्त असतील अशा व्यक्ती त्यांचे घशातील स्त्राव जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी देऊ शकणार आहेत. अशा व्यक्तींनी त्यांचे स्त्राव तपासणी येथे करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

सध्या जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेने 'चेस द व्हायरस' हे लक्ष्य ठेऊन रुग्णांपर्यंत पोहोचण्याची मोहीम आखली आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी यासंदर्भात आरोग्य यंत्रणा आणि सर्व तालुकास्तरीय यंत्रणांना निर्देश दिले आहेत. रॅपिड अँटीजेन चाचण्यांच्या माध्यमातून ही मोहीम गतिमान झाली आहे. आता जिल्हा रुग्णालयातील लॅबची क्षमता वाढल्याने प्रादुर्भाव रोखण्याच्या प्रशासनाच्या प्रयत्नांना अधिक गती मिळणार आहे.

त्याचमुळे आता ज्यांना इतर गंभीर आजार आहेत आणि कोरोनाची लक्षणे जाणवत आहेत तसेच जे बाधित रुग्णाच्या निकट संपर्कातील आहेत, अशा व्यक्तींनी त्यांची चाचणी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अशा व्यक्ती आता जिल्हा रुग्णालयात येऊन त्यांची स्त्राव तपासणी करून घेऊ शकणार आहेत.

ज्यांना लक्षणे नाहीत, अशा कोरोना बाधित रुग्णांनी जिल्हा रुग्णालयात येण्याएवजी त्यांच्या जवळच्या तालुकास्तरीय किंवा महानगरपालिका क्षेत्रातील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. घरातील वृद्ध आणि बालके यांचा सार्वजनिक ठिकाणचा संपर्क टाळणे आवश्यक आहे. विनाकारण वाहने घेऊन रस्त्यावर येऊ नये. संसर्गाची ही साखळी तोडायची असेल तर सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे टाळा, अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर मास्क घालून बाहेर पडा, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details