महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 12, 2020, 10:48 AM IST

ETV Bharat / state

शिर्डी जवळील राहाता शहरात आढळले तीन नवे कोरोनाबाधित रुग्ण

राहाता शहरातील आणखी तीन व्यक्तींना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. यामुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. सामान्य रुग्णालयाकडून आलेल्या अहवालावरुन तीन जण कोरोनाबाधीत असल्याचे स्पष्ट झाले.

शिर्डी
शिर्डी

शिर्डी (अहमदनगर) - महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असून परिस्थिती आणखी गंभीर होत चालली आहे. राहाता शहरातील आणखी तीन व्यक्तींना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. यामुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. सामान्य रुग्णालयाकडून गुरूवारी आलेल्या अहवालावरुन तीन जण कोरोनाबाधीत असल्याचे स्पष्ट झाले.

गेल्या चार दिवसापुर्वी राहाता शहरातील सावता माळी मंदिर परिसरातील बोठे गल्ली येथील 36 वर्षीय तरुणाला कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर खबरदारी म्हणून, त्याच्या कुटूंबातील तसेच संपर्कात आलेल्या एकुण 31 जणांना प्रशासनाने क्वारंटाईन केले होते. क्वारंटाईन केलेल्या व्यक्तींचे स्वॅब नमुने तपासणीसाठी नगर येथे जिल्हा रुग्णालयातील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते.

कोरोना चाचणीचा अहवाल आला असून त्यातील तीन जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तालुक्यातील दोन तर शहरातील 31 व्यक्ती असे एकुण 33 व्यक्तींचे अहवाल प्राप्त झाले. त्यात तिघे पॉझिटीव्ह आढळले असून इतर 30 अहवाल निगेटीव्ह आले असल्याची माहिती तहसिलदार कुंदन हिरे यांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details