अहमदनगर - जिल्ह्यात बुधवारी सकाळी कोरोनावर मात करून तब्बल ६२ रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. एकीकडे रोज साधारण पन्नास नवे रुग्ण वाढत असले तरी त्याच प्रमाणात बरे होऊन घरी परतणाऱ्या रुग्णांचे प्रमाण चांगले आहे. त्यामुळे समाधानाची बाब मानली जात आहे. आतापर्यंत जिल्ह्यामध्ये ७२८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ३२२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतार्यंत एकूण १ हजार ७६ आढळले आहेत.
आज बरे झालेले रुग्ण -
अकोले - ७
नगर ग्रामीण - ८
मनपा हद्दीतील - १४
नेवासा - १
पारनेर - ४
राहाता - २
संगमनेर - १५
शेवगाव - ६
श्रीगोंदा - २
श्रीरामपूर - ३
राज्यातील कोरोना परिस्थिती -
राज्यात मंगळवारी 6 हजार 741 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 2 लाख 67 हजार 665 अशी झाली आहे. मंगळवारी नवीन 4 हजार 500 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 1 लाख 49 हजार 7 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 1 लाख 7 हजार 665 सक्रिय रुग्ण आहेत.