महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

इंदोरीकर महाराजांविरुद्ध पुत्रप्राप्तीविषयी वक्तव्य प्रकरणी उद्या सुनावणी - अहमदनगर लेटेस्ट न्यूज

आपल्या कीर्तनातून पुत्र प्राप्तीचा संदेश कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख यांनी दिल्याचा व्हिडीओ फेब्रुवारी महिन्यात व्हायरल झाल्यानंतर त्यावर बराच ऊहापोह झाला होता. महाराजांनी केलेल वक्तव्य हे पीसीपीएनडीटी कायद्याचा भंग असल्याने त्यावर कार्यवाही करण्याची मागणी अंनिसने केली होती.

इंदोरीकर महाराज
इंदोरीकर महाराज

By

Published : Aug 6, 2020, 9:50 PM IST

शिर्डी (अहमदनगर) - कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख यांनी पुत्र प्राप्तीबाबत केलेल्या वक्तव्याप्रकरणी संगमनेर येथील न्यायालयात दाखल खटल्याचे उद्या कामकाज होणार आहे. तीन जुलैला झालेल्या प्रोसेस इश्यु कामकाजावेळी न्यायालयाने इंदोरीकर महाराजांना न्यायालयापुढे हजर रहाण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे उद्याच्या कामकाजाकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. पोलिसांनी महाराजांना समन्स बजावले होते. आता उद्याच्या कामकाजावेळी जामीन घेण्यासाठी महाराज येतात की, ते त्यांच्या वकीलांमार्फत युक्तीवाद करतात, हे उद्या सकाळी न्यायलायाचे कामकाज सुरू झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.

आपल्या कीर्तनातून पुत्र प्राप्तीचा संदेश कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख यांनी दिल्याचा व्हिडीओ फेब्रुवारी महिन्यात व्हायरल झाल्यानंतर त्यावर बराच ऊहापोह झाला होता. महाराजांनी केलेल वक्तव्य हे पीसीपीएनडीटी कायद्याचा भंग असल्याने त्यावर कार्यवाही करण्याची मागणी अंनिसने केली होती. प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराजांनी पुत्र प्राप्ती विषयी केलेल्या वक्तव्याप्रकरणी पीसीपीएनडीटी कायद्याच्या कलम 22 अंतर्गत 19 जुन रोजी संगमनेरच्या तालुका अधिकाऱ्यांनी महाराजांविरोधात संगमनेर येथील न्यायालयात दावा दाखल केला होता. या प्रकरणात अंनिसच्या सचिव रंजना गवांदे यांनी पाठपुरावा केला होता.

संगमनेरच्या न्यायालायात केस नंबर 207/ 2020 दाखल होवून तीन जुलैला कोर्टात प्रोसेस इश्युचे कामकाज होवून न्यायालयाने इंदोरीकर महाराजांना समन्स बजावत सात ऑगस्ट रोजी न्यायालयासमोर हजर राहण्यास सांगितले आहे. आता उद्या यावर न्यायालयाचे कामकाज होणार असून या वेळी स्वतः इंदोरीकर महाराज हजर रहातात का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. महाराजांना उद्या हजर राहून जामीन घ्यावा लागेल. ते जर काही सबळ कारण देऊन गैरहजर राहिले तर, न्यायालय जामीनासाठी त्यांना पुढची तारीख देऊ शकते. अथवा महाराजांनी उद्या न्यायालयासमोर येऊन जामीन घेतल्यानंतर त्यांना न्यायालयाच्या कामकाजाची पुढील तारीख मिळेल.

ABOUT THE AUTHOR

...view details