महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिर्डीत बनावट दारू बनविणारे गजाआड; उत्पादन शुल्क विभागाची कारवाई - बनावट दारू

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने राहुरी तसेच राहता तालुक्यात सुमारे १ कोटी २० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यासोबत परप्रांतीय आरोपींना जेरबंद केले आहे.

शिर्डीत बनावट दारू बनविणारे गजाआड

By

Published : Jul 29, 2019, 6:03 PM IST

Updated : Jul 29, 2019, 7:44 PM IST

अहमदनगर - राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने राहुरी तसेच राहता तालुक्यात सुमारे १ कोटी २० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यासोबत परप्रांतीय आरोपींना जेरबंद केले आहे. जिल्ह्यातील ही सर्वात मोठी कारवाई असल्याने अवैध व्यावसायिकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.

शिर्डीत बनावट दारू बनविणारे गजाआड

राहुरी कृषी विद्यापीठ परीसरात आणि बाभळेश्वर परीसरात कच्च्या दारूचे रसायन ( स्पीरट) अवैध विक्री करत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. त्यानुसार पथकाने १० परप्रांतीय आरोपींसह ३ टँकर, १ इनोव्हा आणि एक सुमो गाडी असा १ कोटी २० लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. आरोपींना राहुरी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना ४ दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.

सदर कारवाई ही जिल्हा अधीक्षक नवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक निकम, निरीक्षक सुरज कुसळे, प्रकाश आहीरराव, विकास कंठाळे, राजेंद्र कदम, प्रविण साळवे, दिपक बर्डे, नेहाल ऊके, सुनिल वाघ, मुकेश मुजमुले आदींनी ही कारवाई केली. घटनास्थळी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस प्रमुख हे देखील पाहणी करण्यासाठी आले होते.

Last Updated : Jul 29, 2019, 7:44 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details