अहमदनगर- पुणे, मुंबई, नागपूर ठाण्यानतंर आता अहगदनगरमध्ये कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळला आहे. सध्या या रुग्णावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेली आहे.
अहमदनगरमध्ये आढळला कोरोनाचा पहिला रुग्ण, प्रकृती स्थिर - corona virus news
पुणे, मुंबई, नागपूर ठाण्यानतंर आता अहगदनगरमध्ये कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळला आहे. सध्या या रुग्णावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेली आहे.
सध्या जगभरादहशत घातलेल्या कोरोना विषाणूेने भारतात पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. राज्यातही कोरोना विषाणूचा शिरकाव झाला असून,पुणे, मुंबई, नागपूर ठाण्यानतंर आता अहमदनगरमध्ये कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळला आहे. जिल्हा रुग्णालय रुग्णालयातील विलगीकरण कक्षामध्ये या रुग्णावर उपचार सुरू आहेत. दुबईमधून आलेल्या प्रवाशांच्या संपर्कात हा प्रवासी अससल्याची माहीती समोर आली आहे. सदर रुग्णाची प्रकृती सध्या व्यवस्थित असून त्याच्यावर योग्य ते उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेली आहे.