शिर्डी(अहमदनगर)-कोरोनाच्या पुर्वी साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत वर्षाकाठी देशविदेशातून 1 कोटी 70 लाख भाविक शिर्डीत येत असल्याने साईंची झोळीतही वर्षाकाठी तब्बल 380 कोटीच्या आसपास दान भाविकांकडून मिळत होते. मात्र कोरोनाच्या काळात साईमंदीर भाविकांना दर्शनासाठी बंद झाल्यानंतर साईंच्या झोळीत वर्षभरात 94 कोटीचे दान प्राप्त झाले आहे. भाविकांसाठी साईमंदीरात दर्शन बंद झाल्याने वर्षाकाठी 262 कोटी रूपयांचे दान कमी झाले असल्याची माहिती साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी दिली आहे.
कोरोनाचा साईंच्या देणगीवर परिणाम; तब्बल 262 कोटी रूपयांचे दान कमी
साईबाबा संस्थानच्या साईबाबा सुपर स्पेशलिटी रूग्णालय आणी साईनाथ सामान्य रूग्णालय तसेच कोविड सेंटरच्या माध्यमातून अत्याधुनिक उपचाराबरोबरच 640 बेड कोरोना रूग्णांसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. यात 140 ऑक्शीजन बेड आणी 20 व्हेंटीलेटर्सचा समावेश आहे
अत्याधुनिक लॅब
साईबाबा संस्थानच्या साईबाबा सुपर स्पेशलिटी रूग्णालय आणी साईनाथ सामान्य रूग्णालय तसेच कोविड सेंटरच्या माध्यमातून अत्याधुनिक उपचाराबरोबरच 640 बेड कोरोना रूग्णांसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. यात 140 ऑक्शीजन बेड आणी 20 व्हेंटीलेटर्सचा समावेश आहे. वर्षभरात सुमारे 7000 रुग्णांवर मोफत उपचार करून कोरोनातून त्यांना जीवनदान देण्याचे काम साईंच्या या आरोग्य मंदीरातून झाले. रूग्णांबरोबरच रूग्णांच्या नातेवाईकांनाही मोफत जेवण आणि निवास व्यवस्था साईसंस्थानने करून मानुसकीचे दर्शन घडवले आहे. साईबाबांनी आयुष्यभर भक्तांच्या आरोग्याची काळजी घेतली. साईबाबांच्या या आरोग्य सेवेचा वारसा साईबाबा संस्थानच्या माध्यमातून पुढे चालवला जात आहे. कोरोनाच्या संकटात गोरगरीब रूग्णांना अत्याधुनिक उपचार मिळावेत यासाठी साईबाबा सुपर रूग्णालय आणी कोविड सेंटरमध्ये अत्याधुनिक उपचार उपलब्ध करून देण्यात आले आहेत. रूग्णांना प्राणवायुची कमतरता भासू नये यासाठी अंबानी आणि रमनी यांच्या तीन कोटी रूपयांचा दानातून तातडीने एका मिनिटाला 1200 एसपीएमआरएफ लिटर निर्माण होणारा ऑक्सिजन प्लॅन्ट उभारला गेला आहे. कोरोना रूग्णांना आठ तासात कोरोना रिपोर्टचा अहवाल मिळण्यासाठी अत्याधुनिक लॅबही रूग्णसेवेत दाखल करण्यात आली आहे. रूग्णसेवेत साईसंस्थान आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत आहे.