अहमदनगर -चीनमधून नुकत्याच परतलेल्या आणि शुक्रवारी (7 फेब्रुवारी) जिल्हा रुग्णालयात दाखल केलेल्या सुपे एमआयडीसीतील कामगाराच्या रक्ताच्या व घशातील द्रवाचे नमुने घेतले होते. ते तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात आले होते. तो अहवाल जिल्हा रुग्णालयाला प्राप्त झाला असून अहवाल निगेटिव्ह आल्याने डॉक्टरांसह अनेकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
चीनमधून परतलेला 'तो' रुग्ण कोरोनाग्रस्त नाही, अहमदनगर जिल्हा रुग्णालयाची माहिती
नेवासे तालुक्यातील हा 26 वर्षीय तरुण पंधरा दिवसांपूर्वीच चीनमधून परतला. खोकल्याचा त्रास होऊ लागल्याने त्याने श्रीरामपूरमध्ये उपचार घेतले. शुक्रवारी त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याचे रक्ताचे व घशातील द्रवाचे नमुने पुणे येथे तपासणीसाठी पाठविले होते. त्यांचा अहवाल जिल्हा रुग्णालयाला आज सकाळी प्राप्त झाला.
नेवासे तालुक्यातील हा 26 वर्षीय तरुण पंधरा दिवसांपूर्वीच चीनमधून परतला. खोकल्याचा त्रास होऊ लागल्याने त्याने श्रीरामपूरमध्ये उपचार घेतले. शुक्रवारी त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याचे रक्ताचे व घशातील द्रवाचे नमुने पुणे येथे तपासणीसाठी पाठविले होते. त्यांचा अहवाल जिल्हा रुग्णालयाला आज सकाळी प्राप्त झाला. त्या तरुणाच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचे सांगण्यात आले असून त्याला लवकरच सुटी दिली जाणार असल्याचे जिल्हा रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, सुपे (ता. पारनेर) एमआयडीसीतील सुमारे 28 जणांची तपासणी जिल्हा रुग्णालयाच्या पथकाने केली आहे. त्यातील तीन जणांना शनिवारी खोकल्याचा त्रास जाणवला. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आल्याने ते ठणठणीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.