अहमदनगर -शहरातील तीन कोरोना संशयित रुग्ण अचानक विलगीकरण कक्षातून गायब झाल्याने एकच खळबळ उडाली होती. शनिवारी सकाळी या तीनही कोरोना संशयित रुग्णांना विलगिकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. परंतू कोणाला काहीही न सांगता हे रुग्ण कक्षातून घरी परतल्याने आरोग्य विभागाची धावपळ झाली. आरोग्य विभाग आणि पोलिसांच्या मदतीने या तीनही संशयित रुग्णांना पुन्हा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात यश आले आहे.
अखेर नगरमधील 'ते' कोरोना संशयित रुग्ण पुन्हा जिल्हा रुग्णालयात दाखल
नगर शहरातील तीन कोरोना संशयित अचानक कक्षातून गायब झाल्याने आरोग्य प्रशासनाने तोफखाना पोलिसांना लेखी कळवून संबंधितांना शोधण्यास सांगितले होते. हे रुग्ण अचानक गायब झाल्याने शहरात घबराटीचे आणि अफवांचे पीक फुटले होते.
हेही वाचा -खळबळ.. अहमदनगर जिल्हा रुग्णालयातून तीन कोरोना संशयित फरार
नगर शहरातील तीन कोरोना संशयित अचानक कक्षातून गायब झाल्याने आरोग्य प्रशासनाने तोफखाना पोलिसांना लेखी कळवून संबंधितांना शोधण्यास सांगितले होते. हे रुग्ण अचानक गायब झाल्याने शहरात घबराटीचे आणि अफवांचे पीक फुटले होते. दरम्यान आरोग्य विभाग आणी पोलीस विभागाने तातडीने पावले उचलत तिघांनाही पुन्हा रुग्णालयात आणून विलगिकरण कक्षात दाखल केल्याने सर्वांनीच सुटकेचा श्वास सोडला. त्यामुळे कोरोना संशयित रुग्णांचे योग्य मार्गदर्शन आणि समुपदेशन होणे गरजेचे असल्याचे यानिमित्ताने पुढे आले आहे.