अहमदनगर - मागील वर्षी आलेले कोरोनाचे संकट रोखण्यासाठी ग्रामीण भागासह शहरात अत्यंत कडक पद्धतीने अंमलबजावणी केली होती. आता कोरोनाची दुसरी लाट मोठी असून वाढणारी रुग्ण संख्या ही चिंताजनक आहे. त्यामुळे ही रुग्णवाढ थांबविण्यासाठी येत्या 30 एप्रिल पर्यंत प्रत्येकाने लॉग डाऊनचे निर्बंध अत्यंत कडक पद्धतीने पाळावे, असे आवाहन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
संगमनेर येथील अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेज येथे झालेल्या कोरोना उपाययोजनांबाबत च्या आढावा बैठकीत ते बोलत होते.यावेळी आ.डॉ.सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, सभापती सुनंदा जोर्वेकर, डॉ. हर्षल तांबे, उपसभापती नवनाथ अरगडे, उपनगराध्यक्ष शैलेश कलंत्री, प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, तहसीलदार अमोल निकम, बीडीओ सुरेश शिंदे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, वैद्यकीय अधिक्षक डॉ.राजकुमार ज-हाड, वैद्यकीय अधिकारी संदिप कचोरीया, तालुका वैद्यकिय अधिकारी सुरेश घोलप, उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घूगरकर, अमृतवाहिनी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, महेश वाव्हळ व आदि उपस्थित होते.