अहमदनगर - शहरातील सुभेदार गल्ली (झेंडीगेट) व सारसनगर परिसरात सात कोरोना रुग्ण आढळल्याने संबंधित परिसर 'हाॅटस्पाॅट' घोषित केला आहे. आज त्या परिसरातील मुख्य बाधित परिसर म्हणून जाहीर केलेल्या भागातील दुकानेही पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. त्यामुळे आजपासून 'हाॅटस्पाॅट' परिसरापासून दोन किलोमीटरच्या अंतरातील दुकाने पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत.
झेंडी गेट परिसर 'हॉटस्पॉट', बाजूचा दोन किलोमीटर परीघ 'कोअर एरिया' घोषित..
शहरातील सुभेदार गल्लीत प्रारंभी एका वृद्धाला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी संबंधित कुटुंबातील पाच रुग्णांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. गेल्या दोन दिवसांपूर्वी सारसनगर परिसरातील शांतीनगर भागात कोरोनाचा एक रुग्ण आढळला.
शहरातील सुभेदार गल्लीत प्रारंभी एका वृद्धाला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी संबंधित कुटुंबातील पाच रुग्णांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. गेल्या दोन दिवसांपूर्वी सारसनगर परिसरातील शांतीनगर भागात कोरोनाचा एक रुग्ण आढळला. त्या रुग्णाच्या मुलीलाही कोरोना असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे हा परिसर प्रशासनाने हाॅटस्पाॅट म्हणून जाहीर केला. त्या परिसरापासून दोन किलोटमीटरचा भाग हा 'कोअर एरिया' असतो. आज सकाळपासून या परिसरातील दुकाने पूर्णपणे बंद ठेवण्याचा आदेश प्रशासनाने दिला आहे. आज माळीवाडा, पाचपीर चावडी, जुनी महापालिका परिसरासह इतर भागातील दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले.
चितळे रस्त्यावरील भाजीबाजार सुरूच
दरम्यान, चितळे रस्ता, दिल्लीगेट आदी भागात रोज सकाळी भाजी खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडताना दिसत आहे. त्या ठिकाणीही प्रशासनाने विशेष लक्ष घालून बाजार बंद करण्याची गरज आहे. तथापि, याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. हा भाग कोअर एरियापासून जवळच आहे. शहराच्या मध्यवस्तीत असलेला चितळे रस्ता तातडीने बंद करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.