अहमदनगर- कोपरगाव शहरातील 60 वर्षीय महिलेचा कोरोनाशी झुंज देत असताना मंगळवारी पहाटे मृत्यू झाला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील कोरोनाचा हा दुसरा बळी आहे.
अहमदनगरातील कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू, जिल्ह्यातील कोरोनाचा दूसरा बळी - corona in ahmednaar
कोपरगाव शहरातील 60 वर्षीय महिलेचा कोरोनाशी झुंज देत असताना मंगळवारी पहाटे मृत्यू झाला. महिलेचा अहवाल १० एप्रिलला कोरोना पॉझिटीव्ह आला होता. त्यानंतर या महिलेला बूथ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने आणि रक्तदाब वाढल्याने त्याच दिवशी त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले.
कोपरगाव येथील महिलेचा अहवाल १० एप्रिलला कोरोना पॉझिटीव्ह आला होता. त्यानंतर या महिलेला बूथ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने आणि रक्तदाब वाढल्याने त्याच दिवशी त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. तिथे महिलेवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र आज पहाटे त्यांची प्राणज्योत मावळली.
या महिलेच्या मृत्यूमुळे जिल्ह्यात कोरोनाचा दूसरा बळी गेला आहे. मागील आठवड्यात श्रीरामपूर तालुक्यातील एका तरूणाला कोरोनामुळे जीव गमवावा लागला होता..आता या महिलेच्या मृत्यूमुळे जिल्ह्याची चिंता आणखीच वाढली आहे.