महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अहमदनगरमध्ये जुळ्या मुलांना जन्म देणाऱ्या कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू - Ahmednagar corona update

गुरुवारी जुळ्या मुलांना जन्म देणार्‍या महिलेचा आज रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

ahmednagar
जिल्हा रुग्णालय अहमदनगर

By

Published : May 29, 2020, 2:05 PM IST

अहमदनगर- जिल्हा सामान्य रुग्णालयात गुरुवारी जुळ्या मुलांना जन्म देणाऱ्या कोरोनाबाधित महिलेचा आज शुक्रवारी सकाळी मृत्यू झाला. अशी माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली. या महिलेचे गुरुवारी सिझेरियन करण्यात आले होते. या महिलेने काल एक मुलगा आणि एका मुलीला जन्म दिला होता. दोन्ही बाळांची तब्बेत ठीक आहे.


या महिलेची सीझेरियन प्रसूती झाल्यानंतर आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. कोरोनाबाधित असलेल्या या महिलेला न्यूमॅटिक लक्षणे होती, असे नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी सांगितले. ही महिला मुंबईहून निंबलक येथे आली होती. त्यानंतर तपासणीत ही महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details