महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राहाता आणि संगमनेर तालुक्यात कोरोनाचा उद्रेक

जिल्हाधिकाऱ्यांनी १५ एप्रिलपर्यंत सर्व आठवडी बाजार बंदचा निर्णय तर साखरपुडा आणि लग्न सभारंभासाठी पोलिसांची परवानगी घेणं सक्तीचं केलं आहे. राहाता तालुक्यात रुग्ण वाढत असल्याने तालुक्यातील महत्वाची बाजारपेठ असलेल्या कोल्हार गावात तीन दिवसांचा जनता कर्फ्यू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र दुसरीकडे नागरिक अद्यापही बेफिकीर असल्याचे दिसून येत आहे.

कोरोनाचा उद्रेक
कोरोनाचा उद्रेक

By

Published : Mar 26, 2021, 9:47 PM IST

अहमदनगर - जिल्ह्यातील उत्तर भागातील दोन तालुक्यांत कोरोनाचा उद्रेक झाल्याचे पहायला मिळत आहे. संगमनेर आणि राहाता हे दोन तालुके कोरोनाचे हॉटस्पाॅट ठरु लागल्याने या तालुक्याची वाटचाल लॉकडाउनच्या दिशेने होत आहे. एकीकडे राहाता तालुक्यातील कोल्हार भगवतीपूर गावात तीन दिवसांचा जनता कर्फ्यू केला जात आहे. यातच तालुक्यातील इतर ठिकाणाही नागरिक बेफिकीरपणे वावरताना दिसून येत आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी १५ एप्रिलपर्यंत सर्व आठवडी बाजार बंदचा निर्णय तर साखरपुडा आणि लग्नसभारंभासाठी पोलीसांची परवानगी घेण सक्तीच केले आहे. राहाता तालुक्यात रुग्ण वाढत असल्याने तालुक्यातील महत्वाची बाजारपेठ असलेल्या कोल्हार गावात तीन दिवसांचा जनता कर्फ्यू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र दुसरीकडे नागरिक अद्यापही बेफिकीर असल्याचे दिसून येत आहे.

गेल्या २४ तासांत तालुक्यात १४० रुग्ण पॉझिटिव्ह
आरोग्य विभागाकडून मोठ्या प्रमाणावर चाचण्या व खबरदारी घेतली जात आहे. मात्र राहाता तालुक्यातील कोरोना बाधितांचा आकडा कमी होण्याऐवजी दररोज दुप्पटीने वाढत आहे. यामुळे प्रशासन चिंतेत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या २४ तासांत तालुक्यात १४० रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहे. यात सर्वाधिक राहाता शहरात २९ , शिर्डीत २५, लोणी बु. १३ व लोणी खुर्द १३, कोल्हारमध्ये १७ रुग्ण, पाथरे गावात ११ रुग्ण, साकुरी ७, अस्तगावात ५ रुग्ण, निर्मळ पिंप्री ४ तसेच पिंपळस, रांजणखोल, डोर्‍हाळे, पुणतांबा, बाभळेश्वर, वाकडी, तिसगाव, दाढ, चंद्रपूर, या गावांमधेही कोरोनाने डोके वर काढले आहे.

तातडीने कोरोना प्रतिबंधीत औषधे फवारा
राहाता तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कोरोना रूग्ण वाढत असून राहाता शहरात रोज पंचवीसच्या पुढे रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे राहाता शहरात तातडीने औषध फवारणी करणे गरजेचे झाले आहे. अशी मागणी नागरिक करत आहे. तसेच प्रशासनाने कठोर पावले उचलावे, शिवाय याप्रकरणी तहसीलदारांनी कठोर भूमिका घेण्याची गरज असल्याचेही नागरिकांचे मत आहे.

हेही वाचा-ज्यात येत्या रविवारपासून रात्रीची जमावबंदी - मुख्यमंत्री

ABOUT THE AUTHOR

...view details