अहमदनगर- जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोनाबाधित असलेल्या महिलेचे सिझेरियन करण्यात आले. या महिलेने जुळ्यांना जन्म दिला आहे. यामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी आहे. दोन्ही बाळांची आणि मातेची तब्बेत ठीक असल्याचे जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले. दोन्ही बाळांचे वजन २ किलो इतके आहे.
अहमदनगर जिल्हा रुग्णालयात कोरोनाबाधित महिलेने दिला जुळ्यांना जन्म - अहमदनगर कोरोना केसेस
अहमदनगरमधील कोरोनाबाधित महिलेने जुळ्यांना जन्म दिला आहे. ही महिला मुंबईवरुन जिल्ह्यात आलेली होती. जुळ्यांमध्ये एक मुलगा आणि मुलगी आहे.
कोरोनाबाधित महिलेने दिला जुळ्यांना जन्म
मुंबईहून निंबलक येथे आलेली ही महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली होती. आज सकाळी साडेअकरा वाजता तिने या जुळ्यांना जन्म दिला. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या टीमने तिचे सिझेरियन केले.
दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या शंभरीच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. सध्या जिल्ह्यात 99 कोरोनाबाधित रुग्ण आहेत.