अहमदनगर -दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि केरळच्या माजी राज्यपाल शीला दीक्षित यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाने एक अंत्यत अनुभवी, निष्ठावान आणि सुसंस्कृत नेतृत्त्व गमावले आहे. त्यांच्या निधनामुळे कधीही न भरणारी पोकळी निर्माण झाली असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले. यावेळी त्यांनी शीला दीक्षित यांना श्रद्धांजली अर्पण केली.
शीला दीक्षितच्या निधनामुळे काँग्रेसचे अनुभवी, निष्ठावान नेतृत्त्व हरपले - बाळासाहेब थोरात - अहमदनगर
शीला दीक्षित यांनी खासदार, केंद्रीय मंत्री म्हणून दिल्लीच्या विकासात मोलाचे योगदान दिले. त्या दिल्ली काँग्रेसच्या अध्यक्षा असताना त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने मोठा विजय मिळवला होता, असे म्हणत थोरात यांनी शीला दीक्षित यांच्या आठवणींना उजाळा दिला.
शीला दीक्षित आयुष्यभर काँग्रेस विचारधारेशी एकनिष्ठ राहिल्या. त्यांनी काँग्रेस पक्ष संघटनेत विविध पदे यशस्वीरित्या सांभाळली. खासदार, केंद्रीय मंत्री म्हणून दिल्लीच्या विकासात त्यांनी मोलाचे योगदान दिले. त्या दिल्ली काँग्रेसच्या अध्यक्षा असताना त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने मोठा विजय मिळवला होता, असे म्हणत थोरात यांनी शीला दीक्षित यांच्या आठवणींना उजाळा दिला.
शीला दीक्षित यांनी सलग पंधरा वर्ष दिल्लीचे मुख्यमंत्री पद यशस्वीरित्या सांभाळले. दिल्लीचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम त्यांनी केले. केरळच्या राज्यपाल म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. त्यांनी संयुक्त राष्ट्र आयोगात ५ वर्ष भारताचे प्रतिनिधीत्व करून महिलांच्या समस्येकडे संयुक्त राष्ट्राचे लक्ष वेधले होते. राजकारणासोबत सामाजिक क्षेत्रातही त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या निधनामुळे कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे, अशा शब्दात थोरातांनी शोक व्यक्त केला. तसेच त्यांच्या कुटुबीयांच्या दुःखात सहभागी असल्याचे थोरात म्हणाले.