महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार भाजपच्या वाटेवर ?, विखे जो निर्णय घेतील त्यासोबत जाणार - Sangamner

काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार

By

Published : May 25, 2019, 11:09 PM IST

Updated : May 25, 2019, 11:58 PM IST

2019-05-25 23:01:08

शपथविधी 1 तारखेनंतर होणार असल्याचा गौफ्यस्फोट

काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार


अहमदनगर - राधाकृष्ण विखे पाटील जो निर्णय घेणार त्या निर्णयाबरोबर जाणार असल्याचे काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी म्हटलंय. संगमनेरात एका खाजगी कार्यक्रमात ते बोलत होते. विखेंना मानणाऱ्या आम्हा सर्वांसाठी विखेंचा निर्णय अंतिम असल्याचं सत्तार म्हणाले असून येत्या 1 तारखेनंतर आम्ही शपथविधी घेणार असल्याचा गौफ्यस्फोट आमदार अब्दुल सत्तार यांनी केला आहे.

राधाकृष्ण विखे पाटील एका मागे एक काँग्रेस पक्षाला धक्का देताना आता आपल्याला पहिला मिळत आहे. विखे पाटील काँग्रेस पक्षा बाहेर पडल्यावर आता अजून एक धक्का काँग्रेस पक्षाला देताना पाहायला मिळत आहे. आज राधाकृष्ण विखे पाटील तसेच काँग्रेस पक्षाचे आमदार अब्दुल सत्तार संगमनेर गावात एका मंचावर दिसले.

काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी विखे विरोधक समजल्या जाणाऱ्या बाळासाहेब थोरात यांच्या गावात हे व्यक्तव्य केल्याने आता सगळ्यांचे डोळे विस्फारले आहेत.

राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या विरोधी पक्ष पदाचा राजीनामा दिल्या नंतर सर्वांचे लक्ष विखे पाटलांकडे लागलेले पाहायला मिळत आहे. विखे पाटील कोणत्या पक्षात जाणार आणि काय भूमिका असणार, तसेच विखे पाटीलांसोबत किती आमदार असणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. आज काँग्रेस पक्षाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी केलेल्या व्यक्तव्यामुळे लक्षात येत आहे की, एक आमदार आता विखेंच्या बरोबर येत आहेत.

Last Updated : May 25, 2019, 11:58 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details