महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 6, 2019, 9:44 PM IST

Updated : Dec 6, 2019, 10:58 PM IST

ETV Bharat / state

'फास्ट ट्रॅकवर त्वरित निर्णय करत कठोर शिक्षा झाली पाहिजे, गरज पडल्यास कायद्यात बदल करा'

जलद गतीने निर्णय होऊन कठोर शिक्षा झाली पाहिजे, कायद्यात त्रुटी असतील तर राष्ट्रीय पातळीवर निर्णय घेतले पाहिजेत, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली. गरज असल्यास कायद्यात बदल करा, अशी आग्रही मागणी थोरात यांनी केली.

balasaheb thorat
बाळासाहेब थोरात

अहमदनगर- जलद गतीने निर्णय होऊन कडक शिक्षा झाली पाहिजे, कायद्यात त्रुटी असतील तर राष्ट्रीय पातळीवर निर्णय घेतले पाहिजेत, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. गरज असल्यास कायद्यात बदल करा, अशी आग्रही मागणी थोरात यांनी केली. हैदराबाद येथे पशुवैद्यकीय डाॅक्टर तरुणीवर बलात्कार आणि त्यानंतर हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील चार आरोपींचा आज (शुक्रवार) पोलिसांनी एन्काऊंटर केला आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात

हेही वाचा -'सरकार नेमकं कुणाच्या बाजूनं, उन्नावमध्ये मागील ११ महिन्यात ९० बलात्कार'

पक्ष सोडून गेलेल्यांचा निर्णय नवनेतृत्वाकडे

ऐनवेळी पक्ष सोडून गेलेल्यांचा प्रवेश त्यांची जागा अनेक नव्या चेहऱ्यांनी घेतली आहे. या सर्व नव्या चेहऱ्यांच्या संमतीने आता निर्णय घ्यावा लागेल, कारण त्यांनी ऐनवेळी पक्ष सोडून गेल्यानंतर काम केले आहे आणि विजय प्राप्त केला आहे, असे सांगत थोरतांनी विखेंसह कोणीही पक्षात येण्यास उत्सुक असेल तर 'वेट अँड वाॅच' ही भूमिका सूचित केली आहे.

राधाकृष्ण विखेंबाबत थेट त्यांना विचारा की, ते अस्वस्थ आहेत का? असा प्रतिसवाल करत थोरातांनी जिल्ह्याच्या आणि राज्याच्या काँग्रेसच्या चाव्या आता आपल्याकडेच असल्याचे सूचित केले.

Last Updated : Dec 6, 2019, 10:58 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details