शिर्डी- काँग्रेस आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. कांबळे यांनी साईबाबा यांच्या समाधीचे दर्शन घेवून शिर्डी लोकसभा मतदारसंघात प्रचार चालू केला आहे.
साईंच्या समाधीचे दर्शन घेवून आघाडीचे उमेदवार कांबळे यांची प्रचाराला सुरुवात - लोकसभा
कांबळे यांनी साईबाबा यांच्या समाधीचे दर्शन घेवून शिर्डी लोकसभा मतदारसंघात प्रचार चालू केला आहे.
BHAUSAHEB KAMBLE 11
शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडून भाऊसाहेब मल्हारी कांबळे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यांनी निवडणूक अधिकारी पिराजी सोरमारे यांच्याकडे अर्ज सादर केला. अर्ज भरल्यानंतर कांबळे यांनी शिर्डीतील दत्तनगर, ओम साई नगर, कालिकानगर या भागात प्रचार केला. भाऊसाहेब कांबळे यांनी कार्यकर्त्यांबरोबर जावून भेटी घेतल्या. यावेळी आमदार डॉ सुधीर तांबे, डॉ.एकनाथ गोंदकर, निलेश कोते आदी नेते मंडळी उपस्थित होते.