महाराष्ट्र

maharashtra

राहुरीतून शिवाजी कर्डीलेच, नगराध्यक्ष कदम बंडाच्या दिशेने

By

Published : Oct 2, 2019, 11:11 PM IST

राहुरी विधानसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार शिवाजी कर्डिले यांनाच अजुन एकदा विधानसभेचे तिकीट मिळाल्याने देवळाली नगरपालिकेचे नगराध्यक्ष सत्यजित कदम नाराज दिसत आहेत. ते अजित पवार यांचे नातेवाईक असल्याने राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे.

शिवाजी कर्डीले, सत्यजीत कदम

अहमदनगर - राहुरी विधानसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार शिवाजी कर्डिले आणि देवळाली नगरपालिकेचे नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्यात तिकिटासाठी गेल्या काही दिवसांपासून रस्सीखेच सुरू होती. मात्र, मंगळवारी विद्यमान आमदार कर्डीलेंना पक्षाचा एबी फाॅर्म मिळाला आहे. त्यामुळे भाजपचे निष्ठावंत म्हणून ओळख असणाऱ्या कदम यांच्या गोटात प्रचंड असंतोष पसरला आहे.

राहुरी विधानसभा मतदारसंघाची सद्यस्थिती

हेही वाचा - औसा मतदारसंघात कार्यकर्त्यांचा रोष; मुख्यंत्र्यांच्या पसंतीच्या उमेदवाराला विरोध

सत्यजित कदम हे माजी आमदार चंद्रशेखर कदम यांचे चिरंजीव आहेत. शिवाय चंद्रशेखर कदम हे अजित पवारांचे जवळचे नातेवाईक आहेत. यामुळे आक्रमक झालेले कार्यकर्ते वेगळी चूल मांडण्याच्या तयारीत आहेत. राष्ट्रवादीचे प्रमुख नेते कदमांच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांकडून समजली आहे. यामुळेच आता फॉर्म भरण्यासाठी काही तास शिल्लक असल्याने ऐनवेळी वेगळे चित्र निर्माण होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

शिर्डी राहुरीचे भाजपचे माजी आमदार चंद्रशेखर कदम यांच्या गोटात नाराजी असल्याने सत्यजीत कदम मेळावा घेऊन भूमीका जाहिर करणार आहेत.

हेही वाचा -भाजपमध्ये बंडाळीची लाट; विद्यमान आमदारांसह 2 जिल्हाध्यक्ष युतीविरोधात निवडणुकीच्या रिंगणात

ABOUT THE AUTHOR

...view details