अहमदनगर - कल्याण डेपोत एसटी महामंडळाच्या सेवेत असलेले विजय महादेव राठोड (वय 46, मूळ गाव वाघळूज जि. बीड, सध्या रा. बुऱ्हाणनगर जि. अहमदनगर) यांचे आज रविवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
माहिती देताना विजय राठोड यांचा मुलगा हेही वाचा -Merger of ST - तुम्ही एअर इंडियाचे खाजगिकरणावर का बोलले नाही?, अजित पवारांची भाजपवर टीका
विजय राठोड यांना आज कुटुंबीयांसोबत असताना हृदयविकाराचा तीव्र झटका आला, त्यानंतर त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांचा मुलगा अभिषेक राठोड याने वडील उपोषण आंदोलनात सहभागी होते, गेल्या पाच-सहा दिवसांपासून ते उपोषण करत होते. महामंडळाच्या तुटपुंज्या पगाराने घरखर्च भागत नव्हता. दिवाळीला केवळ अडीच हजार बोनस भेटला. सात हजाराच्या पगारात घर चालत नव्हते. कोरोना काळात लॉकडाऊनमध्ये काम करून देखील पाच-सहा महिन्यांचा पगार मिळालेला नव्हता. अशात घर चालवायचे कसे, असा प्रश्न आणि चिंता नेहमी असल्याचे मुलाने सांगितले.
हेही वाचा -नगर हादरलं : 74 वर्षीय महिलेवर घरात घुसून केला बलात्कार!