अहमदनगर- सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचा 54 वा गळीत हंगाम शुभारंभ आज करण्यात आला. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, खासदार राजीव सातव यांच्यासह काँग्रेस नेते यावेळी उपस्थित होते.
केंद्राच्या शेतकरी कायद्यांचा काळे कायदे म्हणून यावेळी उल्लेख करण्यात आला. या कायद्यांविरोधात काँग्रेसने महाराष्ट्रात आंदोलन सुरू केले आहे. याचाच पुढचा टप्पा म्हणून आज दुपारी 4.00 वाजता महाराष्ट्रात शेतकरी बचाओ व्हर्च्युअल रॅली आयोजित केली आहे. या रॅलीचे 10 हजार गावात एकाचवेळी आयोजन केले जाणार आहे. सोशल मीडियावरही ही रॅली पाहता येईल अशी व्यवस्था करण्यात आली असून 50 लाख शेतकर्यांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न आहे.