अहमदनगर Sujay Vikhe Patil: आरक्षणाच्या प्रश्नावर कोणताही राजकीय प्रतिनिधी सध्या बोलायला घाबरत आहे. एखादा व्यक्ती सामंजस्याने बोलायला गेला तरी त्याचा एखादा शब्द काढून विपर्यास केला जातोय. (Sujay Vikhe Patil On Maratha reservation) एखादी व्यक्ती राज्य सरकारकडे किंवा न्यायालयात बाब मांडायला गेला तरी त्याचा विपर्यास केला जातो. म्हणून आता सगळ्यांची भूमिका आणि सगळ्यांना आमचा पाठिंबा आहे हेच वक्तव्य आहे. दुर्दैवाने आंदोलनाला हिंसक वळण लागलं. त्यामुळे कोणी मार्ग सांगायलाही आता तयार नाहीये, असं भाजपाचे खासदार सुजय विखे पाटील म्हणाले.
11 लाख लोकांना कुणबी प्रमाणपत्र :मराठा समाजाला आरक्षण मिळेल हे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी सांगितलं आहे. त्यांनी मांडलेल्या भूमिकेला सगळ्या पक्षांनी पाठिंबा दिलेला आहे. 11 लाख लोकांना कुणबी प्रमाणपत्र दिली जातायेत. त्यामुळे न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवून शांततेच्या मार्गाने पुढे जावं लागेल असं मत भाजपाचे खासदार सुजय विखे यांनी मांडलं. राहाता आणि शिर्डी शहरात सुरू असलेल्या मराठा आमरण उपोषणकर्त्यांशी सुजय विखे यांनी भेट दिल्यानंतर ते बोलत होते. मी एक मराठा आणि डॉक्टर या नात्याने राहाता शिर्डी येथील आमरण उपोषणास बसलेल्यांना पाठिंबा देण्यासाठी आलो आहे, असं ते म्हणाले.