अहमदनगर -विरोधी पक्षनेते सुजय विखे पाटील यांच्या भाजपमधील प्रवेशाने जिल्ह्यातील काँग्रेसला मोठे खिंडार पडले आहे. अशातच काँग्रेस जिल्हा अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेले करण ससाणे यांच्या निवासस्थानी जावून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. यामुळे करण ससाणे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.
करण ससाणे भाजपमध्ये प्रवेश करणार? मुख्यमंत्र्यांनी निवासस्थानी भेट घेतल्याने चर्चेला उधाण - Girish Mahajan
करण ससाणे हे श्रीरामपूर विधानसभेचे दोन वेळा काँग्रेस पक्षाकडून आमदार राहिलेले तसेच साई संस्थांनचे माजी अध्यक्ष जयंत ससाणे यांचे पुत्र आहेत.

शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे युतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवींद्र फडवणीस यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सभेपूर्वी मुख्यमंत्री फडणवीस , पालकमंत्री राम शिंदे आणि गिरीश महाजन यांनी गुरुवारी करण सासणे यांच्या निवास्थानी जाऊन भेट घेतली आहे.
कोण आहेत करण ससाणे ?
करण ससाणे हे श्रीरामपूर विधानसभेचे दोन वेळा काँग्रेस पक्षाकडून आमदार राहिलेले तसेच साई संस्थांनचे माजी अध्यक्ष जयंत ससाणे यांचे पुत्र आहेत. मुख्यमंत्री फडणवीस आणि जयंत ससाणे यांचे चांगले संबंध असल्याने मुख्यमंत्र्यांनी ससाणे यांची भेट घेतल्याचीही चर्चा आहे. ई टीव्ही भारतला सूत्रांच्या मिळालेल्या माहितीनुसार करण ससाणे येणाऱ्या दोन दिवसात भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांना भाजपकडून मोठे पद दिले जाणार असल्याचे सूत्राने सांगितले आहे. करण ससाणे भाजपमध्ये प्रवेश करणार का ? ससाणे यांना भाजप कुठले पद देणार ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.