महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिर्डीकरांनी बंद मागे घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन; नीलम गोऱ्हेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट - dr nilam gorhe ahemednagar latest news

शिर्डी साईबाबा जन्मस्थानांचा मुद्दा खूप वर्षापासून प्रलंबित आहे. साईबाबांनी त्यांचे आयुष्य हे लोक कल्याणासाठी वाहिले. जन्मस्थानाच्या मुद्द्यावरुन भाविकांत गैरसमज पसरत आहेत. जन्मस्थान हा भाविकांच्या आस्थेचा विषय आहे. मात्र, तरी त्यात बऱ्याच गोष्टी पुरात्तत्व विभागाशी संलग्न आहेत.

Dr. Nilam gorhe
डॉ. नीलम गोऱ्हे

By

Published : Jan 18, 2020, 7:59 PM IST

Updated : Jan 18, 2020, 8:10 PM IST

अहमदनगर - शिर्डी आणि पाथरी येथील प्रश्नांबाबत विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. याभेटीनंतर शिर्डीकरांनी बंद मागे घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले, अशी माहिती डॉ. गोऱ्हे यांनी दिली.

डॉ. नीलम गोऱ्हे (उपसभापती, विधानपरिषद)

गोऱ्हे पुढे म्हणाल्या, शिर्डी साईबाबा जन्मस्थानांचा मुद्दा खूप वर्षापासून प्रलंबित आहे. साईबाबांनी त्यांचे आयुष्य हे लोक कल्याणासाठी वाहिले. जन्मस्थानाच्या मुद्द्यावरुन भाविकांत गैरसमज पसरत आहेत. जन्मस्थान हा भाविकांच्या आस्थेचा विषय आहे. मात्र, तरी त्यात बऱ्याच गोष्टी पुरात्तत्व विभागाशी सलग्न आहेत. यात शिर्डी आणि पाथरी येथील भाविकांचे आणि ग्रामस्थांशी बैठक घेऊन दोन्ही ठिकाणचा विकास होण्याच्या दृष्टीने पावले उचलावीत. तसेच माजी न्यायमूर्ती आणि पुरातत्व विभागाचे तज्ञ यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात यावी. या समितीस 3 महिन्यांचा कालावधी देण्यात येऊन साईबाबांच्या जन्मस्थानाच्या निवाडा करण्यात यावा, अशी सूचना डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली.

हेही वाचा -'आधी केले मग सांगितले'... अशोक चव्हाणांनी स्वतः हटवले अनधिकृत बॅनर

हा बंद मागे घेण्याचे आवाहन करण्यात यावे आणि तात्काळ शिर्डी येथील ग्रामस्थ यांची बैठक घेण्यात यावी, अशी सूचना डॉ.गोऱ्हे यांनी केली. यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी पुढील आठवड्यात शिर्डी आणि पाथरी येथील ग्रामस्थांची बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन दिले. शिर्डी ग्रामस्थांनी बंद मागे घेण्याचे आवाहनही केले.

Last Updated : Jan 18, 2020, 8:10 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details