महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अहमदनगरमध्ये राहुल गांधींच्या स्वागतालाही उरली नाही काँग्रेस - फडणवीस

राहुल गांधींच्या स्वागतालाही अहमदनगरमध्ये काँग्रेस उरली नाही...मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची शिर्डीतील प्रचारसभेत खोचक टीका... राधाकृष्ण विखेंनाही भाजपमध्ये आणणार असल्याचे सुजय विखेंचे विधान...

By

Published : Apr 26, 2019, 9:05 PM IST

शिर्डीतील प्रचारसभेतील दृश्ये


अहमदनगर- विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजीनामा दिलाय, तर त्यापाठोपाठ जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष करण ससाणे यांनीही आपले पद सोडले आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यात राहुल गांधी यांचे जोरदार स्वागत होत असल्याची खोचक टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ते आज श्रीरामपूर येथे सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी आले असता बोलत होते.

शिर्डीतील प्रचारसभेतील दृश्ये


लोखंडेंच्या प्रचारसभेवेळी दक्षिणचे उमेदवार सुजय विखे, प्रा. राम शिंदे देखील उपस्थित होते. त्यावेळी राम शिंदे काँग्रेसवर निशाणा साधला. तर सुजय विखेंनीही राधाकृष्ण विखेंना लवकरच भाजपमध्ये आणणार असल्याचे स्पष्ट केले.

सुजय म्हणाले, काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये आता राहिलंय कोण? मी ऐनवेळी भाजपमध्ये आलो. आता माझ्यापाठोपाठ वडिलांनाही लवकरच भाजपमध्येत आणणार असल्याचे वक्तव्य सुजय विखे यांनी केले आहे. त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी चर्चा सुरू झाली आहे.

नगरची निवडणूक पार पडल्यानंतर विखे पाटील शिर्डी लोकसभा मतदारसंघात दाखल झाले. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने रंगत आली आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कोणत्या तंबूत दाखल झाले. त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील आता काय करणार हे वेगळं सांगायची गरज नसल्याचेही सांगत राम शिंदे यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. तसेच विखेंच्या भाजप प्रवेशावर सूचक विधान केले.


सुजय विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी काँग्रेसलाच सुरूंग लावलाय. एक-एक करत सर्वांना काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारापासून दूर ठेवत बाळासाहेब थोरात यांना शह देण्यासाठी कंबर कसली आहे. त्यामुळे शिर्डीची लढाई आता सेनाविरूद्ध काँग्रेस न होता, विखे-विरूद्ध थोरात, अशी झाली आहे. यात कोणाचा विजय होणार हे येत्या 23 मेलाच स्पष्ट होईल.

ABOUT THE AUTHOR

...view details