अहमदनगर - जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथे रविवारी शालेय विद्यार्थी आणि नागरिकांच्यावतीने नदी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. तसेच नदीच्या प्रवाहात निर्माल्य न टाकण्याचे आवाहन करण्यात आले.
श्रीरामपूरमध्ये ग्रामस्थांनी राबवली प्रवरा नदी स्वच्छता मोहीम - बेलापूर
बेलापूर खुर्द येथे गेल्या २ वर्षांपासून स्वच्छदुत कार्यरत आहेत. नेहमीच ते गावाची तसेच नदीपात्राची स्वच्छता करीत असतात. याच स्वच्छतादुतांनी रविवारी नागरिक आणि शालेय विद्यार्थ्यांना नदी स्वच्छतेचे आवाहन केले होते.
बेलापूर खुर्द येथे गेल्या २ वर्षांपासून स्वच्छदुत कार्यरत आहेत. नेहमीच ते गावाची तसेच नदीपात्राची स्वच्छता करीत असतात. याच स्वच्छतादुतांनी रविवारी नागरिक आणि शालेय विद्यार्थ्यांना नदी स्वच्छतेचे आवाहन केले होते. सर्व मिळून बेलापूरपासून प्रवरा नदीच्या स्वच्छतेला सुरुवात करण्यात आली. दिवसभर नदीतील गाळ, केर-कचरा काढण्यात आला. तसेच अनावश्यक झाडी साफ करण्यात आली. बघता बघता संपूर्ण नदीपात्र स्वच्छ करण्यात आले. त्यांना सकारात्मक प्रतिसाद देत नागरिक तसेच बेलापूर केशव गोविंद हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने या स्वच्छता अभियानात सहभाग घेतला होता.