अहमदनगर :शिर्डीच्या साईबाबा संस्थानात साईभक्तांच्या सुरक्षेसाठी नेमलेल्या सुरक्षारक्षक भाविकामध्ये हाणामारीची घटना घडली आहे. साई मंदीर परिसराच्या पाच क्रमांकाच्या गेटमधूनच भाविकांना बाहेर सोडले जाते मात्र, या गेटमधूनच मंदीरात प्रवेश देण्याच्या कारणावरुण सुरक्षा रक्षाकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. या बाचाबाचीचे रुपांतर नंतर हाणामारी झाले आहे. वादानंतर झालेल्या हाणामारीचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला आहे.
फ्री स्टाईल हाणामारी :साई मंदिराच्या पाच क्रमांकाच्या गेट बाहेर मुंबईच्या पालखीत साई भक्त सुरक्षा रक्षक यांच्यात फ्री स्टाईल भांडण झाले. साईबाबा संस्थानचे सुरक्षा प्रमुख अण्णासाहेब परदेशी यांनी सांगितले की, साईबाबा संस्थानच्या सुरक्षा विभागाने शिर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
बॅगवरुन हाणामारी : बाहेरगावी जाणाऱ्या पालखीतील भाविकांना संस्थानच्या सुरक्षा रक्षकांनी धक्काबुक्की केल्याने साई भक्त तसेच सुरक्षा रक्षकांमध्ये धक्काबुक्की झाल्याचा प्रकार शिर्डीच्या साई मंदीरात घडला आहे. धक्काबुक्कीनंतर वाद विकोपाला जावून वादाचे रुपांतर हाणामारीत झाले आहे. हाणामारीचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. मंदीरात राहिलेले बॅग आणण्यासाठी भक्तांने आत जाण्यासाठी रक्षाकांसोबत वाद घातला. साई भक्ताला प्रवेश नाकारण्यात आल्याने सुरक्षारक्षकात तसेच साई भक्तात सुरवातीला बाचाबाची झाली. या बाचाबाचीचे रुपांतर नंतर हाणामारीत झाले.