महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोपरगाव बसस्थानकावर खळबळ, मुलीचे अपहरण करणाऱ्याला नागरिकांचा दणका - अहमदनगरमध्ये अल्पवयीन मुलीला पळवले न्यूज

कोपरगाव बस स्थानकावरून एका अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या आरोपीला नागरिकांनी पकडले. गणेश उद्धव बोरुडे असे त्या आरोपीचे नाव आहे. मुलीच्या आजीने आरडाओरड केल्याने नागरिकांनी आरोपीला पकडले. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

कोपरगाव
कोपरगाव

By

Published : Jun 24, 2021, 5:14 PM IST

अहमदनगर - कोपरगाव बस स्थानकावरील नागरिकांनी अल्पवयीन मुलीला पळवून घेऊन जाणाऱ्याच्या तावडीतून सोडवले आहे. मुलीसोबत असलेल्या आजीने आरडाओरडा केली. त्यानंतर लोक धावून आले आणि आरोपीला पकडले. यानंतर आरोपीला पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. या घटनेने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे. गणेश उद्धव बोरुडे (48 वर्षे) असे त्या आरोपीचे नाव आहे.

वासुदेव देसले, पोलीस निरीक्षक

आजी ओरडल्याने टळले नातीचे

वैजापूर तालुक्यातील 60 वर्षीय वृद्ध महिला तिच्या 8 वर्षीय नातीसह कोपरगाव येथील आपल्या नातेवाईकांकडे आल्या होत्या. त्या पुन्हा आपल्या घरी वैजापूर येथे जाण्यासाठी कोपरगाव बस स्थानकावर गाडीची वाट पाहत होत्या. यावेळी तेथे आरोपी गणेश उद्धव बोरुडे (रा. लक्ष्मीनगर ता. कोपरगाव) हा आला. तो 8 वर्षाच्या चिमुरडीला पळवून नेऊ लागला. हे पाहून मुलीच्या आजीने आरडाओरडा केली.

आरोपीवर गुन्हा दाखल

आजीने आराडाओरड केल्याने तेथील जमलेल्या लोकांनी या मुलीला आरोपी गणेशच्या तावडीतून सोडवले. लगेच लोकांनी शहर पोलीस ठाण्यात याची माहिती दिली. पोलिसांनी माहिती मिळताच घटनास्थळावरून आरोपीला ताब्यात घेतले. अल्पवयीन मुलीच्या आजीच्या फिर्यादीवरून आरोपी गणेश उद्धव बोरुडे याच्या विरोधात भादवी कलम 363, 511 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा -एटीएम कार्डचे क्लोनिंग करुन पैसे काढणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांकडून पर्दाफाश

ABOUT THE AUTHOR

...view details