महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Shirdi : साई संस्थान विरोधात शिर्डी ग्रामस्थ कोते यांचे उपोषण - etv bharat live

शिर्डीतील सामाजिक आणि माहिती अधिकार कार्यकर्ते दिगंबर हरिभाऊ कोते यांनी भाविकांच्या आणि ग्रामस्थांच्या विविध मागण्यांसाठी साईबाबांचा व्दारकामाई समोरील नाट्यगृहाच्या समोर 18 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजला पासून हे उपोषण सुरु केले आहे.

Shird
Shird

By

Published : Nov 20, 2021, 7:20 PM IST

अहमदनगर - कोरोनाचे नियम शिथील असतांनाही शिर्डीत साई संस्थानचे प्रसादालय अद्याप खुले करण्यात आले नाही. भक्तांच्या या प्रश्नाची मागणी घेवून शिर्डीतील सामाजिक कार्यकर्ते दिगंबर कोते यांनी उपोषण सुुरु केले आहे. आज या उपोषणाचा तिसरा दिवस असूनही प्रशासनाने या आंदोलनाची दखल घेतली नसल्याचे कोते म्हणाले आहे.

ग्रामस्थ कोते यांचे उपोषण
शिर्डीतील सामाजिक आणि माहिती अधिकार कार्यकर्ते दिगंबर हरिभाऊ कोते यांनी भाविकांच्या आणि ग्रामस्थांच्या विविध मागण्यांसाठी साईबाबांचा व्दारकामाई समोरील नाट्यगृहाच्या समोर 18 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजला पासून हे उपोषण सुरु केले आहे. सर्व मागण्या साई संस्थान मान्य करत नाही तो पर्यंत उपोषण सुरुच राहणार असल्याचे कोते यांनी सांगितले.
कोतेंच्या आहेत विविध मागण्या

कोते यांचे उपोषण
शिर्डीला दररोज येणारे भाविक व्दारकामाईत जावून दर्शन घेतात. मात्र कोरोनाचे नियम म्हणून साई संस्थाने साईमंदीरात जाणाऱ्या दर्शन रांगेतून द्वारकामाईत दर्शन घ्यावे लागते. त्यामुळे द्वारकामाईचा दक्षिण दरवाजा खुला करण्याच्या मागणी बरोबरच शिर्डीत येणाऱ्या भाविकांना संपुर्ण ऑफलाईन दर्शन सुरु करावे. साईट्रस्टचे दोनशे रुम द्वारावती भक्त निवाससमोरील गार्डन सुरु करावे. त्याच बरोबर साईमंदिर परिसराच्या महाव्दार क्रमांक तीन मधून भाविकांना दर्शनासाठी जाऊ द्यावे व बाहेर येऊ द्यावे अशा विविध मागण्यांसाठी कोते यांनी उपोषण सुरू केले आहे.

काय आहेत कोते यांचा मागण्या ?
1)व्दारकामाई मंदिराचा दक्षिण दरवाजा खुला करणे.

2)साईट्रस्टचे प्रसादालय,भोजनालय सुरु करावे.

3)संपुर्ण ऑफलाईन दर्शन सुरु करावे.

4)साई ट्रस्टचे दोनशे रुम ( द्वारावती भक्त निवास समोरील ) गार्डन सुरु करावे.

5)साईमंदिर परिसराच्या महाव्दार क्रमांक तीन मधून भाविकांना दर्शनासाठी जाऊ द्यावे व बाहेर येऊ द्यावे.

6)साई ट्रस्टने जागोजागी सार्वजनिक रस्ते अडवून नियमबाह्य लावलेले लोखंडी बॅरिकेट काढून रस्ते भक्तांसाठी खुले करावे.

हेही वाचा -Clean Survey 2021 : स्वच्छ सर्वेक्षणात पुण्याची बाजी, स्पर्धेत पुणे देशात पाचवे

ABOUT THE AUTHOR

...view details