अहमदनगर : विद्यार्थ्यांनी स्वत:च बनवले गणपती; अशोक डोळसे यांचा पर्यावरणपूरक उपक्रम - शाडूची माती
गणेशाची मूर्ती बनवताना ती पर्यावरणपूरक असावी. ती पाण्यात विरघळणाऱ्या शाडूची माती आणि नैसर्गिक रंगांपासून बनलेली असावी, याकडे सध्या जास्त कल दिसून येत आहे. नगरमधील कला शिक्षक असलेले अशोक डोळसे हे शिल्पकार गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या कलाश्री दालनात पर्यावरणपूरक गणपती बनवण्याच्या कार्यशाळा घेत आहेत.

कलाशिक्षक अशोक डोळसे
अहमदनगर -१४ विद्या आणि ६४ कलांचा अधिपती अर्थात गणेशाचे आगमन काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. त्यामुळे गणेशोत्सवासाठी घरोघरी तयारी सुरू आहे.
गणपती बनवण्यात मग्न असलेले विद्यार्थी